Maharashtra Lockdown : हरभजन सिंग संतापला, त्यानंतर त्याचे ट्विट झाले व्हायरल

देशात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) आहे.  

Updated: Mar 31, 2021, 01:50 PM IST
Maharashtra Lockdown : हरभजन सिंग संतापला, त्यानंतर त्याचे ट्विट झाले व्हायरल title=

मुंबई : देशात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकांना आवाहन केले असताना कोविड-१९ च्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी कडक लॉकडाऊनचा (Maharashtra Lockdown) इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले. त्यांच्या या ट्विटला क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांने रिट्विट केले आहे. यावेळी त्यांने आपला  संताप व्यक्त केला आहे. त्या  त्याने रागाची इमोजीही पोस्ट केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या लॉकडाऊनच्या वक्तव्यावर हरभजन सिंगने आपली भूमिका मांडली आहे. त्यानंतर हरभजनचे ट्विट व्हायरल झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यामध्ये लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. जर राज्यातील नियम कडकपणे पाळले गेले नागीत, तर लॉकडाऊन पुन्हा लावण्यात येऊ शकतो. पण ठाकरे यांच्या या निर्णयानंतर हरभजन सिंगने आपले मत व्यक्त केले आहे. 

कोरोनाबाबतचे जे नियम आहेत ते लोक पाळत नसल्याचे पाहायला मिळत आहे, त्यामुळे हे असेच सुरु राहिले तर लॉकडाऊन लावावा लागेल, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. ठाकरे यांच्या या मतानंतर हरभजन लोकांवर चांगलाच संतापला आहे. हरभजनने ट्विट केले आहे, " लोकांना नेमके काय करावे हेच समजत नसेल तर लॉकडाऊन लावायलाच हवा. हे लोक कधी समजूतीने वागणार, हेच समजत नाही." हरभजनने हे ट्विट 29 मार्चला केले आहे. त्यानंतर हे जोरदार व्हायरल होत आहे.

देशात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रामध्ये आढळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे यात आणखी वाढ झाली तर लॉकडाऊन लावण्यात येईल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच दिला आहे. देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांची वाढती संख्या आणि लसीकरण मोहीमेबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देताना सांगितले की, देशात प्रामुख्याने 10 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, नांदेड, अहमदनगर, दिल्ली आणि बेंगळुरू शहर यांचा यात समावेश आहे.