आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत मंत्री पदावर कायम राहणार!

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा तडकाफडकी राजीनामा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. 

Updated: Jun 5, 2018, 11:38 PM IST
आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत मंत्री पदावर कायम राहणार! title=

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा तडकाफडकी राजीनामा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. दरम्यान, त्यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते मंत्री पदावर कायम राहणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून डॉ. सावंत यांच्या मंत्री पदावर राहण्याला हिरवा कंदील, देण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा पुढील आदेश येईपर्यंत डॉ. सावंत मंत्री पदावर कायम राहणार आहेत. सावंत यांना मंत्री पदावर कायम ठेवण्याबाबत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस अनुकूल असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना व्यक्ती सहा महिने मंत्री पदावर राहू शकते हा नियम आहे. डॉ. सावंत यांना मुंबई पदवीधर मतदार संघ निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी नाकारल्याने डॉ. सावंत व्यथित झाले होते.

डॉ.सावंत यांच्याऐवजी पक्षाचे उत्तर मुंबईचे विभागप्रमुख विलास पोतनीस यांना संधी दिली आहे. त्यामुळे सोमवारीडॉ. सावंत यांनी आरोग्यमंत्री पदाचा तडकाफडकी राजीनामा  दिला होता. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता. मात्र, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला होता. त्यामुळे मंगळवारी आज झालेल्या कॅबिनेट बैठकीला डॉ. सावंत उपस्थित राहिले होते.