मुंबईत पावसाची पु्न्हा हजेरी, सखल भागात साचलं पाणी

दादर परिसरात पाणी साचलं 

Updated: Jul 27, 2020, 11:29 AM IST
मुंबईत पावसाची पु्न्हा हजेरी, सखल भागात साचलं पाणी

मुंबई : मुंबईत येत्या २४ तासात मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलं आहे. मुंबई आपत्कालीन विभागाकडून सध्या मुंबईत रिमझिम पाऊस सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. संध्याकाळी ५ वाजता हाय टाईड असून ३.९९ मीटरपर्यंतच्या लाटा उसळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.  

दादरच्या सखल भागात पाणीच पाणी झालं असून अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्याचप्रमाणे मुंबईत अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम देखील झालं आहे.

सोमवारी पहाटेपासून उपनगरातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत. पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे हिंदमाता, अंधेरी, कुर्ला, सायन यासह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत येत्या काही तासात आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आठवडाभरपासून दडी मारलेल्या पावसाने मुंबईत पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. पावसाने हवेत गारवा पसरला असून वातावरणही आल्हाददायी झाल्यामुळे मुंबईकरांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.

मुंबईतील दादर, परळ, सायन, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, गोरेगाव, मालाड या भागांत पाणीच पााणी झालं आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचलं आहे. पाणी साचल्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. सांताक्रुज,अंधेरी, हिंदमाता, परेल, कुर्ला यासारख्या अनेक भागात ट्रफिक झालं आहे.