मुंबई पोलिसांकडून उत्सव काळासाठी हाय अॅलर्ट

मुंबईतल्या बाजारपेठा, मॉल्स आणि सार्वजनिक उत्सव याठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता, दहशतवाद्यांकडून घातपाताची शक्यता आहे.

Updated: Aug 17, 2017, 12:28 PM IST
मुंबई पोलिसांकडून उत्सव काळासाठी हाय अॅलर्ट title=

मुंबई : येते २-३ महिने असणारा सणांचा काळ लक्षात घेता, मुंबई पोलिसांनी हायअलर्ट घोषित केला आहे. मुंबईतल्या बाजारपेठा, मॉल्स आणि सार्वजनिक उत्सव याठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता, दहशतवाद्यांकडून घातपाताची शक्यता आहे.

 त्यामुळे खबरादीराचे उपाय करत मुंबई पोलिसांनीही कंबर कसली असून, पूर्ण ताकदीनिशी मुंबईकरांच्या सरंक्षणाकरता पोलीस सज्ज आहेत. 

या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाकरता मुंबई पोलिसांनी विशेष योजना तयार करत, नागरिक आणि सार्वजनिक उत्सव मंडळांकरता गाइडलाइन्सही तयार केल्या आहेत. 

तसंच आपतकालीन परिस्थितीत मंडळांच्या कार्यकर्त्यांनी नेमक का़य करायला हवं, याचं प्रशिक्षणही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना दिलं जात आहे. शिवाय प्रत्येक नागरिकानं स्वतःच दक्ष राहण्याचं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.