मुंबई : आज दुपारी दोन वाजून 39 मिनिटांनी समुद्राला उधाण येणार आहे. आताच समुद्र खवळलेला दिसतोय.
त्यामुळे, खवळलेल्या समुद्रापासून सावध राहण्याचं आणि अतिसाहसी धाडस टाळण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलंय.
दरम्यान, तीन दिवसांच्या सुट्टीनंतर ऑफिस निघालेल्या मुंबईकरांना आज सकाळी पावसानं गाठलं. सुट्टीच्या दिवशी आनंद देणारा पाऊस आज मात्र सर्वांनाचा नकोसा वाटत होता. काही सखल भागात पाणी साचले आहे. सकाळपासूनच पूर्व उपनगरात पावसाने जोर धरला आला तरी वाहतुकीवर मोठा परिणाम दिसत नाही.
मुंबई उपनगरात पावासाचा जोर अजूनही कायम आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल आहे. मुलुंड भांडुप भागात साचचेल्या पाण्यामुळे एस रोडही प्रभावित झालाय.