धक्कादायक ! हिरेन यांच्या मास्क खाली आढळले अनेक हातरुमाल

कालपासून बेपत्ता असलेले हिरेन मनसुख यांचा मृतदेह  मुंब्रा खाडीत सापडला आहे.

Updated: Mar 5, 2021, 08:41 PM IST
धक्कादायक ! हिरेन यांच्या मास्क खाली आढळले अनेक हातरुमाल

मुंबई : कालपासून बेपत्ता असलेले हिरेन मनसुख (Hiren Mansukh) यांचा मृतदेह  मुंब्रा खाडीत सापडला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्या तोंडावर असलेल्या माक्स खाली 5 हातरुमाल होते. मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याचा व्हिडिओ झी मीडियाच्या हाती लागला आहे. यामुळे आता या प्रकरणाला एक नवीन वळण लागलं आहे. आत्महत्या की हत्या अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

कोण आहेत हिरेन मनसुख?

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी एक स्कॉर्पिओ गाडी स्फोटकांसह आढळली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतानाच या प्रकरणात या गाडीचे मालक हिरेन मनसुख यांच्या मृत्यूने या प्रकरणाचं गुढ आणखी वाढलं आहे. काल रात्रीपासून बेपत्ता असलेले हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला होता. त्यांच्या कुटुंबियांनी सकाळी ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

या प्रकरणाचे पडसाद विधीमंडळात देखील पाहिला मिळाले. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी विधीमंडळात तातडीने चौकशीची मागणी केली आहे. 'मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली, याचे प्रकरण एनआयएकडे द्यावी. मनसुख हिरेन नेमके कुणाला कॉफर्ड मार्केटला भेटले?. सचिन वझे हेच तिथं पहिल्यांदा पोहचले होते. तेच तपास अधिकारी होते. गाडी मालक व सचिन वझे यांचे जून, जुलैमध्ये संभाषण झालंय. दोघेही ठाण्याचेच आहेत. यातून संशय तयार झाला. महत्वाचा दुवा हा मनसुख हिरेन होते व त्यांचीच डेथ बॉडी मिळाली आहे. या प्रकरणामध्ये गौडबंगाल आहे. तात्काळ ही केस एनआयएकडे वर्ग करायला हवी.' असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

गृहमंत्री याबाबतीत स्पष्ट भूमिका का मांडत नाहीत?. ज्या गोष्टी मला समजतात, त्या गृहमंत्र्यांना समजत नाहीत का? गाडी मालक व सचिन वझे यांची ओळख असणे हे गंभीर आहे. पहिल्यांदा या प्रकरणाच्या खोलापर्यंत जावं लागेल. असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे.

'गृहमंत्र्यांनी निवेदन करून एटीएसकडे तपास दिल्याचे सांगितले. अर्ध्या तासापूर्वी मुंबई ठाणे पोलिसांचे शौर्य सांगत होते व आता हा तपास लगेच एटीएसकडे का दिला गेला? असं अर्ध्या तासात काय घडलं. या प्रकरणात काळं बेरं आहे.
पोस्ट मार्टेमच्या ठिकाणी सचिन वाझे उपस्थित आहे ते तिथं का हजर आहेत.' असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.