Maharashtra Corona | कोरोनामुक्तांचा आकडा वाढला, दिवसभरात किती पॉझिटिव्ह?

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या ही नियंत्रणात आहेत. मात्र चिंता अजूनही कायम आहे.   

Updated: Jul 16, 2021, 09:14 PM IST
Maharashtra Corona | कोरोनामुक्तांचा आकडा वाढला, दिवसभरात किती पॉझिटिव्ह?  title=

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा सातत्याने 9 हजारांपेक्षा कमी आहे. मात्र अजूनही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात हातपाय पसरलेत. त्यामुळे राज्याची काहीशी चिंता वाढलेली आहे. राज्यात आज (16 जुलै) दिवसभरात 8 हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. 24 तासात एकूण 7 हजार  761 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. (in maharashtra today 16 july 7 thousand 761 corona patients found)

राज्यातील एकूण 13 हजार 452 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांत कोरोनामुक्तांपेक्षा बाधितांचीच संख्या जास्त होती. पण आज जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 59 लाख 65 हजार 644 बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही 96.27% इतकी झालीय.

किती जणांचा मृत्यू? 

कोरोनामुळे मागील 24 तासांमध्ये 167 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर हा आता 2.04% इतका झालाय. राज्यातील 5 लाख 85 हजार 967 व्यक्ती होमक्वारटाईन आहेत. तर 4 हजार 576 व्यक्ती संस्थातमक आहेत. 

मुंबईतील रुग्णसंख्या

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा घट झालेली दिसतेय. दिवसात मुंबईत एकूण 446 रुग्णांची नोंद करण्यात आलीय. तर 470 जण कोरोनामुक्त झालेत. मुंबईत आतापर्यंत 705234  जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट हा जैसे थे म्हणजेच 96 टक्के इतकाच आहे. मुंबईत आता एकूण 6 हजार 973 सक्रीय रुग्ण आहेत.