दिवसभरात राज्यात १२ हजारहून अधिक नवे कोरोना रुग्ण; ३४४ जणांचा बळी

आज एका दिवसात महाराष्ट्रात 13 हजार 408 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याची दिलासादायक बाब आहे. 

Updated: Aug 12, 2020, 09:25 PM IST
दिवसभरात राज्यात १२ हजारहून अधिक नवे कोरोना रुग्ण; ३४४ जणांचा बळी
संग्रहित फोटो

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. बुधवारी राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. 24 तासात राज्यात 12 हजार 712 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 344 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढता असताना, दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत असताना, आज एका दिवसात महाराष्ट्रात 13 हजार 408 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याची दिलासादायक बाब आहे. 

राज्यातील आतापर्यंतची कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 48 हजार 313 इतकी झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत 3 लाख 81 हजार 843 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्त बरे होण्याचं प्रमाण-रिकव्हरी रेट 69.64 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 1 लाख 47 हजार 513 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रात आजपर्यंत 18 हजार 650 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्यातील मृत्यूदर 3.4 टक्के एवढा आहे. 

राज्यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त एकट्या मुंबईत आहेत. आतापर्यंत मुंबईत 1,26,356 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 1 लाख 69 रुग्ण बरे झाले आहेत. तर मुंबईत 6,943 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मुंबईत सध्या 19,047 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

सध्या राज्यात 10,15,115 जण होम क्वारंटाईनमध्ये असून 35,880 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.