अजित पवार यांना आणखी एक धक्का, पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

याआधी आज सकाळी अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती

Updated: Oct 7, 2021, 07:33 PM IST
अजित पवार यांना आणखी एक धक्का, पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. आज सकाळपासून अजित पवार यांच्या निकटवर्तींच्या घरावर आणि कार्यालयावर आयकवर विभागाने धाड टाकली. सकाळी अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. अजित पवार यांची एक बहिण कोल्हापूरला तर दोन बहिणी पुण्यात राहतात. 

त्यानंतर आता अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने धाड टाकली आहे. अनंता मर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर आयकर विभागाने धाड टाकली आहे. पार्थ पवार अनंता मर्क्स कंपनीचे संचालक आहेत. मुंबईतल्या नरिमन पॉईंट इथं असलेल्या कंपनीच्या कार्यालाची दुपारपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना झाडाझडती घेतली. 

अजित पवारांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले. ( Income tax raids) यावर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझ्या रक्ताच्या नातेवाईकांवर छापेमारी करण्यात आली आहे. छापे टाकणे हे आयकर विभागाचे काम आहे. मात्र, जर राजकीय हेतूने ही छापेमारी करण्यात आली असेल तर ते दुर्दैव आहे. दरवर्षी नियमित कर भरत आहोत. माझ्या बहिणी आहेत, म्हणून धाड टाकणे याचे खूप वाईट वाटत आहे. (Income tax raids in Pune: Ajit Pawar's first reaction)

भाजपसंबंधित एकाही कारखान्यावर धाड पडलेली नाही किंवा चौकशी झालेली नाही. फक्त माझ्या बहिणी आहेत म्हणून त्यांच्यावर धाडी टाकता, याचे वाईट वाटत आहे. जो पक्ष केंद्रात सत्तेत आहे. त्यांच्या कोणत्या कारखान्यावर धाड पडलेली नाही, असे अजित पवार म्हणाले.