आमचं ठरलं... अपक्ष आमदारांनी वाढवलं भाजप, शिवसेनेचं टेन्शन

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिल्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. महाडिक यांच्या उमेदवारी अर्जामुळे अपक्ष आमदारांचा भाव वधारला आहे.  

Updated: Jun 2, 2022, 01:14 PM IST
आमचं ठरलं... अपक्ष आमदारांनी वाढवलं भाजप, शिवसेनेचं टेन्शन title=

मुंबई : छत्रपती संभाजीराजे ( Chtarpati Sambhajiraje ) यांनी राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून निवडणुकीतून माघार घेतली. तर, दुसरीकडे भाजपने धनंजय महाडिक ( Dhananjay Mahadik ) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. यामुळे या निवडणुकीत अपक्ष आमदारांचा भाव वधारला आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीची गणिते जुळविण्यात सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackarey ) यांनी राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने अपक्ष आमदारांची बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी आमदारांना निधी कमी पडणार नसल्याचे आश्वासन दिले होते.

त्यानंतर राज्यसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी महाराष्ट्रातील अपक्ष आमदारांची एक स्वतंत्र बैठक होणार होती. पण अद्याप ही बैठक झालेली नाही. या निवडणुकीत कुणाला मतदान करायचे यावर अपक्ष आमदारांचे एकमत झालेले नाही. त्यामुळे अपक्ष आमदार कोणती भूमिका घेतात याकडे महाविकास आघाडीतील नेत्यांसह भाजपचेही लक्ष लागून राहिले आहे.