Indian Railway : रेल्वे गाड्या आता 24 डब्यांच्या, प्रवास सुखकर होणार

रेल्वे प्रशासनाने (Indian Railway)  मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रेल्वे प्रवास हा सुखकर आणि आरामदायी होणार आहे.    

Updated: Nov 7, 2022, 09:35 PM IST
Indian Railway : रेल्वे गाड्या आता 24 डब्यांच्या, प्रवास सुखकर होणार title=

मुंबई :  प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन (Indian Railway) कायम लोकपयोगी निर्णय घेत असते. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांचा आतापर्यंत प्रवाशांना फायदा झाला आहे. आता पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रेल्वे प्रवास हा सुखकर आणि आरामदायी होणार आहे. आता रेल्वे गाड्या या तब्बल 24 डब्ब्यांच्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे एकाचवेळेस अतिरिक्त प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. तसेच यातून रेल्वेलाही उत्पन्न मिळणार आहे. (indian railway will increasing  number coaches now 24 coaches to long route raiway who departure csmt mumbai)
 
मुंबईतून दररोज सीएसएमटीवरुन बाहेरगावी अनेक रेल्वे गाड्या जातात. या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या डब्ब्यांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे.  या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना तब्बल  24 डब्बे असणार आहेत. आता डब्बे वाढले म्हटल्यावर प्लॅटफॉर्मही वाढवावा लागणार. त्यामुळे सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 10, 11, 12 आणि 13 ची लांबी वाढवली जाणार आहे.  

प्रवाशांना दिलासा 

परवडणारे तिकीट दर,  सुरक्षित प्रवास आणि वेळेत पोहचण्याची हमी यामुळे रेल्वेला प्रवाशांची पहिली पसंती असते. मात्र आता या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.