मुंबई : पोलीस शिपाई भरतीकडे (Maharashtra Police Recrutiment) राज्यातील तरुण-तरुणी डोळे लावून बसले होते. या पोलीस भरतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अनेक नाट्यानंतर अखेर पोलीस भरतीला मुहुर्त सापडलाय. त्यानुसार आता 18 हजार पोलीस शिपाई पदांचा रस्ता मोकळा झालाय. या भरतीसाठी बुधवारपासून सुरुवात होणार आहे. काही आठवड्यांपूर्वी प्रशासकीय कारण देत पोलीस भरती स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे तरुणांचा हिरमोड झाला होता. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devedra Fadnavis) यांनी रोजगार मेळाव्यात येत्या आठवड्याभरात पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल, असं एका कार्यक्रमात म्हटलं होतं. अखेर पोलीस भरतीचा नारळ बुधवारपासून फुटणार आहे. (maharashtra police recruitment state government made big changes in exam format now ground exam 1st then written)
यंदापासून भरती प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवारांना आधी शारिरीक चाचणी (Ground Exam) द्यावी लागणार आहे. मैदानी परीक्षा उत्तीर्ण झालेलेच लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. याआधी आतापर्यंत आधी लेखी मग मैदानी परीक्षा व्हायची.
दरम्यान राज्यातील जवळपास 109 DCPच्या बदल्या केल्या गेल्या आहेत. पुणे आणि मुंबईत फेरबदल केले गेले आहेत. विशेष बाब अशी की या बदलीमध्ये मुंबईत अनेक वर्षांपासून पोलीस उपायुक्त पदावर असेलल्या अधिकाऱ्यांची विदर्भ आणि मराठवाड्यात बदल्या करण्यात आल्या आहेत.