IRCTC घेऊन आलीय टूर पॅकेज, बजेटचीही चिंता मिटली

स्वस्तात मस्तय IRCTC टूर पॅकेज, तुम्हाला जायचं असेल जाणून घ्या पॅकेजबद्दल 

Updated: Nov 14, 2022, 11:06 PM IST
IRCTC घेऊन आलीय टूर पॅकेज, बजेटचीही चिंता मिटली  title=

मुंबई : आयआरसीटीसी (IRCTC) दरवर्षी प्रवाशांसाठी उत्तम टूर पॅकेज (Tour Package) लाँच करत असतो. असाच टूर पॅकेज पुन्हा एकदा आयआरसीटीसी घेऊन आलीय. या टूर पॅकेज मध्ये तुम्हाला एका सुंदरशा ठिकाणी भेट देता येणार आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला 8 रात्री 9 दिवस घालवण्याची संधी मिळणार आहे. अगदी बजेटमध्ये हे टूअर पॅकेज असणार आहे.त्यामुळे जर फिरायला जायचा विचार करत असाल तर आताच तिकीट बूक करा.  
  

टूर पॅकेज

आयआरसीटीसी आपल्या प्रवाशांना राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये प्रवास करण्याची संधी देत​आहे. या टूर पॅकेजचे नाव आहे 'रॉयल​राजस्थान एक्स-मुंबई' (ROYAL RAJASTHAN EX MUMBAI). हे टूर पॅकेज नुकत्याच सुरू झालेल्या 'देखो अपना देश' कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आले आहे. ज्या अंतर्गत प्रवासाची आवड असलेल्या लोकांना राजस्थानमध्ये एकूण 8 दिवस आणि 9 रात्री घालवण्याची संधी मिळणार आहे.

'या' ठिकाणी भेट देता येणार

या स्पेशल टूर पॅकेजमध्ये राजस्थानमधील अनेक शहरांच्या खास ठिकाणांना भेट देता येणार आहे. जसे जैसलमेरचा किल्ला, गडीसर तलाव, पटवो की हवेली आणि जैसलमेरमधील युद्ध संग्रहालय दाखविल्यानंतर जयपूरचा अंबर किल्ला, बिर्ला मंदिर, जयगड किल्ला, आणि जलमहाल आणि शेवटी उदयपूर, जोधपूर या परिसरांना भेट देता येणार आहे. यासह बिकानेर सारख्या शहरांना भेट दिली जाईल.

इतर सुविधा

या टूर पॅकेजमध्ये विमानाने प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय संपूर्ण प्रवासादरम्यान तुम्हाला नाश्ता, दुपारचे जेवण आणि नंतर रात्रीचे जेवण देखील मिळेल. यासोबतच तुम्हाला वेगवेगळ्या शहरातील उत्तम हॉटेल्समध्ये राहण्याची सोय केली जाईल. शहरांतर्गत फिरण्यासाठी लोकल बसची सुविधाही देण्यात येणार आहे.

बजेट किती? 

या टूर पॅकेजसाठी बजेट किती आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर एका व्यक्तीसाठी 57 हजार 100, 2  व्यक्तींसाठी 43 हजार 400 आणि 3 जणांनी एकत्रित पॅकेज घेतल्यास 40,700 रुपये मोजावे लागतील. मुंबई ते राजस्थान हे विमान 19 नोव्हेंबरला उपलब्ध होणार आहे.

दरम्यान तुम्हाला या टूअर पॅकेज (Tour Package)  बाबत आणखीण माहिती जाणून घेण्यासाठी आयआरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाईटला भेट द्यावी लागले. तसेच याच साईटवर तिकीट बूक देखील करता येणार आहेत.