शरद पवार यांच्या सोबत जवळीक असणे हा गुन्हा आहे का? सजंय राऊत यांचा सवाल

जेव्हा शरद पवारांसोबत सरकार बनवले तेव्हा हेच लोक होते ना पुढे होते ना सरकारमध्ये घुसायला, हेच लोक बाहेर रांगा लावून उभे होते आम्हाला घ्या. आता तुम्ही भाजपा सोबत गेलात. यामुळे तुम्ही आता कोणाची अंतर्व्रस्त धुतायं असा खोचक टोला संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला.

Updated: Nov 30, 2022, 10:23 PM IST
शरद पवार यांच्या सोबत जवळीक असणे हा गुन्हा आहे का? सजंय राऊत यांचा सवाल title=

Sanjay Raut : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) आणि संजय राऊत( Sajay Raut) यांच्या महाविकास आघाडीच्या स्थापनेत मोठे योगदान आहे. महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर शरद पवार आणि संजय राऊत यांच्यातील जवळीक वाढली आहे. यावर संजय राऊत यांनी थेट भाष्य केले आहे.  शरद पवार यांच्या सोबत जवळीक असणे हे या महाराष्ट्रात, देशात गुन्हा आहे का? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांननी उपस्थित केला आहे.  शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती व्हावी अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच इच्छा होती असं संजय राऊत म्हणाले(Maharashtra Politics).

पवार साहेब तुम्ही दिल्ली सांभाळा आम्ही महाराष्ट्र सांभाळतो असे बाळासाहेब म्हणाले होते. शरद पवार यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील योगदान फार मोठं आहे. त्यांच्याकडून बरचं काही शिकण्यासारख आहे. यामुळे शरद पवारांचे शिष्य असल्यास गैर काय असेही शरद पवार म्हणाले.  

जेव्हा शरद पवारांसोबत सरकार बनवले तेव्हा हेच लोक होते ना पुढे होते ना सरकारमध्ये घुसायला, हेच लोक बाहेर रांगा लावून उभे होते आम्हाला घ्या. आता तुम्ही भाजपा सोबत गेलात. यामुळे तुम्ही आता कोणाची अंतर्व्रस्त धुतायं असा खोचक टोला संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला.

शरद पवार या महारष्ट्राचे आणि देशाचे महत्वाचे नेते आहेत. ते चार वेळा मुख्यमंत्री होते. सामाजिक, राजकीय, कृषी, शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रचंड कार्य केलेय. शरद पवारांकडून राजकीय विद्यार्थ्यांना खूप काही शिकण्यासारखे आहे. शरद पवरांकडून काही गोष्टी शिकण्याची संधी मिलाली तर त्यात गैर काय? शरद पवारांविरोधात अत्यंत घाणेरडे आरोप केले जातात. सिल्वर ओक आणि मातोश्री यांची युती झाली असेल तर कुणाच्या पोटात दुखण्याचे कारण काय?