close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'जवाहरलाल नेहरु यांच्यामुळे काश्मीर प्रश्न उभा राहीला'

'जवाहरलाल नेहरू यांनी यावेळी युद्धबंदीची घोषणा केल्यामुळे काश्मीर निर्माण झाला'

Updated: Sep 22, 2019, 02:01 PM IST
'जवाहरलाल नेहरु यांच्यामुळे काश्मीर प्रश्न उभा राहीला'

मुंबई : जवाहरलाल नेहरू यांनी यावेळी युद्धबंदीची घोषणा केल्यामुळे काश्मीर निर्माण झाला तसेच युद्धबंदीमुळे पीओके उभा राहीला असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. अनुच्छेद 370 वर गोरेगाव येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.  राहुल बाबा तुम्ही तर काल-परवा राजकारणात आलात पण आमच्या तीन पिढ्या काश्मीरच्या मुद्द्यावर लढत होत्या असा टोलाही त्यांनी लगावला. कार्यकर्त्यांनी अनुच्छेद 370 घेऊन जनतेसमोर जावे असे आवाहन अमित शाह यांनी केले. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा अनुच्छेद 370 हाच राहील हे स्पष्ट झाले आहे. 

महत्त्वाचे मुद्दे 

जनतेसाठी पाठवलेला पैसा लुटला

2 लाख 27 हजार कोटींचा भ्रष्टाचार

काश्मीरमध्ये 370 अनुच्छेद ठेवणे हा काँग्रेससाठी राजकीय मुद्दा होता. पण भाजपाला यात राजकारण करायचे नव्हते. 

3 परिवारांमुळे काश्मिरमध्ये भ्रष्टाचार 

राहुल गांधी हे देशविरोधात घोषणा देणाऱ्यांविरोधात