'देशातील परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून' केसीआर यांनी दिले संकेत

'ही तर फक्त सुरुवात आहे, भाजपाविरुद्ध तिसऱ्या आघाडीची सुरुवात महाराष्ट्रातून'  

Updated: Feb 20, 2022, 05:04 PM IST
'देशातील परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून' केसीआर यांनी दिले संकेत title=

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (k Chandrashekar Rao) आज मुंबईत दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांची भेट घेतली. 

देशातील राजनिती, देशातील विकासाबाबत आणि स्वातंत्र्यानंतर देशातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आपण महाराष्ट्रात आलो आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीत अनेक गोष्टींवर चर्चा झाली अशी माहिती के चंद्रशेखर राव यांनी दिली.

देशाच्या प्रगतीसाठी, देशात चांगल्या सुविधा आणण्यासाठी देशाच्या विकासाला गती देण्यासाठी, पॉलिसी बदलण्यासह अनेक विषयांवर चर्चा झाली. अनेक विषयांवर सहमती झाली आहे. आगामी काळात एकत्र काम करण्याबाबत सहमती झाली आहे, असं राव यांनी म्हटलंय. 

देशात इतरही काही पक्ष आहेत, त्यांच्याशीही बोलणं सुरु आहे, उद्धव ठाकरे यांचंही बोलणं सुरु आहे. लवकरच आम्ही भेटू आणि पुढची रणनिती ठरवू. आज देशात ज्या प्रकारे राजकारण सुरु आहे त्या बदलाची गरज आहे. देशात मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. एक मजबूत भारत बनवण्यासाठी काम करणार आहोत. 

महाराष्ट्रातून मोर्चे निघालेले मोर्चे यशस्वी ठरले आहेत. छत्रपती शिवाजी महाज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठा योद्धांकडून या देशाला प्रेरणा मिळाली आहे, त्याच प्रेरणेतून आम्ही पुढची वाटचाल करु असं के चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे.