काँग्रेस आमदाराची भाजपच्या कार्यक्रमात उपस्थिती, चर्चेला उधाण

 भाजपात कधी प्रवेश करणार?

Updated: Oct 11, 2018, 01:06 PM IST
काँग्रेस आमदाराची भाजपच्या कार्यक्रमात उपस्थिती, चर्चेला उधाण

मुंबई : ऐतिहासिक शीव किल्ल्याच्या नुतनीकरण उदघाटनप्रसंगी भाजपानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी हजेरी लावली. त्यामुळे कोळंबकर भाजपाच्या अगदी जवळ गेले असून ते भाजपात कधी प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्यात. गणेशोत्सव काळात भाजप नेत्यांचे फोटो असलेले फलक लावल्याने कोळंबकरांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यातच सायन इथल्या खुल्या जिमचं उदघाटन कोळंबकर यांनी केलं.

दसऱ्याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन करणार का? असा प्रश्न विचारला असता यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास कोळंबकरांनी नकार दिलाय. आशिष शेलार आणि आपण एकाच गावचे असल्याने एका कार्यक्रमात असल्याची सारवासारव त्यांनी केली.