मुंबई : कमला मिल अग्नीतांडव प्रकरणी कमला मिलचे मालक रमेश गोवानी यांना आज अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
एमआरटीपी कायद्याचं उल्लंघन करणं, बेकायदेशीर कामास मदत करणं, मृत्यूस कारणीभूत होणं, अशा विविध कलमांखाली रमेश गोवानी यांच्यावर गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.
२९ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता कमला मिल कम्पाउंड मधील वन अबव आणि मोजोस ब्रिस्त्रो रेस्टॉरंटनमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात संबंधितांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा देखील दाखल केला होता. त्यानुसार आता गोवानी यांना अटक करण्यात आलीय.