मुंबई : आजारपणाचं कारण देत मुंबईत सेंट जॉर्ज रूग्णालय़ात दाखल झालेले कर्नाटकचे आमदार श्रीमंत पाटील यांचा जबाब नोंदवण्यासाठी कर्नाटक पोलीस मुंबईत आले. मुंबई पोलिसांसह ते रूग्णालयात दाखल होत त्यांनी पाटील यांचा जबाब नोंदवला. दरम्यान, आमदार श्रीमंत पाटील यांच्या भेटीला काँग्रेस नेतेही रुग्णालयातही पोहोचले आहे. त्यामुळे ते काय सांगतात, याची उत्सुकता आहे. तर दुसरीकडे भाजपने त्यांचे अपहरण केले, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
Maharashtra: Karnataka Police accompanied by Mumbai Police arrive at St. George Hospital, where Karnataka Congress MLA Shrimant Patil is admitted. pic.twitter.com/89yr69DWzV
— ANI (@ANI) July 19, 2019
Mumbai Police has allowed Karnataka Police officials to meet and take statement of Congress MLA Shrimant Patil, who is admitted at St George hospital in Mumbai (file pic) pic.twitter.com/lUMbQbNM8e
— ANI (@ANI) July 19, 2019
कर्नाटक पोलीस उपायुक्त नीलेश कुमार यांनी श्रीमंत पाटील यांचा जबाब नोंदवला. जबाब नोंदवल्यावर कुमार मुंबई पोलीस आयुक्तालयाकडे रवाना झाले. विश्वासदर्शक ठरावाला काही काळ बाकी असतानाच पाटील बंगळुरूतून मुंबईत आले. त्यामुळे श्रीमंत पाटील यांना भाजपाने पळवल्याचा आरोप काँग्रेसने काल होता. काँग्रेसने त्यांच्या अपरहरणाची तक्रारही दाखल केली आहे. कर्नाटक पोलीस श्रीमंत पाटील यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते.