मुंबई येथे रस्त्याच्या कडेला झोपलेल्या चिमुरड्याचे अपहरण, सराईत गुन्हेगाराला बेड्या

 Child Kidnapped : जुहू चौपाटी परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला झोपलेलेल्या एका कुटुंबातील लहान मुलाचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  

Updated: Dec 29, 2021, 07:45 AM IST
मुंबई येथे रस्त्याच्या कडेला झोपलेल्या चिमुरड्याचे अपहरण, सराईत गुन्हेगाराला बेड्या title=

मुंबई : Child Kidnapped : जुहू चौपाटी परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला झोपलेलेल्या एका कुटुंबातील लहान मुलाचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लहान मुलगा गायब असल्याची तक्रार पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये दखल करण्यात आली होती. त्यानंतर सांताक्रूझ पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. (Child Kidnapped in Mumbai)

जुहू चौपाटी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये हा अपहरणाचा प्रकार चित्रित झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या माहितीच्या आधारे तपास करण्यासाठी पाच पथक तयार केलीत. अवघ्या चार तासच्या आतमध्ये  आरोपीचा शोध घेण्यात यश आले आहे. साईद शेख याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. साईद शेख हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याच्यावर चोरी, ड्रग्ज याबाबत विविध गुन्हे दाखल आहेत.  

मुलींना शोधण्यासाठी 'मुस्कान अभियान' 

दरम्यान, याआधी बोईसर येथील सदिच्छा साने ही एमबीबीएसची विद्यार्थिनी परीक्षेसाठी घराबाहेर पडलेली असताना वांद्रे इथून दिवसाढवळ्या बेपत्ता झाली होती. याचे पडसाद हिवाळी अधिवेशात उमटले. बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याचा प्रश्न हिवाळी अधिवेशानात उपस्थित करण्यात आला. गेल्या सहा महिन्यात मुंबईतून 534 मुलींच्या अपहरणाची नोंद झाल्यासंदर्भातील प्रश्न शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना सतेज पाटील यांनी दिली.

दरम्यान, मुंबईत पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून आणखी सात हजार सीसीटीवही कॅमेरे लावण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.  सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. मात्र उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करणार असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितले.

बेपत्ता झालेल्या मुली सापडण्याचं प्रमाण 95 ते 97 आहे. बेपत्ता मुलींना शोधण्यासाठी मुस्कान अभियान यांसारख्या विविध उपाययोजना सरकार राबवत आहे. या प्रश्नाबाबत समाजमाध्यमे ही अनेक पुढाकार घेत आहेत. त्यांच्याशी सायबर विभाग संवाद वाढवून ही मोहीम विस्तारण्यासाठी मदत करेल, असे सतेज पाटील यांनी सांगितले.