Kishori Pednekar : लायकी समजायला वेळ लागत नाही; किशोरी पेडणेकर यांची किरीट सोमय्यांवर निशाणा

 किशोरी पेडणेकरांनी ट्विट करून सोमय्यांवर निशाणा साधला आहे. एखाद्या अती शहाण्याला उत्तर देण्यापेक्षा नि:शब्द होऊन पुढे गेलं ना की, त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही असं ट्विट किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

Updated: Jan 15, 2023, 11:30 PM IST
Kishori Pednekar : लायकी समजायला वेळ लागत नाही; किशोरी पेडणेकर यांची किरीट सोमय्यांवर निशाणा title=

Maharashtra Politics : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) पोलिस चौकशीच्या फेऱ्यात सापडल्या आहे.  गोमाता एसआरएप्रकरणी (SRA Scam) किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात वांद्रेतल्या निर्मल नगर पोलीस स्थानकात (Nirmal Nagar Police Station) फसणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर आता  किशोरी पेडणेकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी  भाजपन नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधला आहे (Maharashtra Politics).

गेल्या वर्षात 22 डिसेंबरला किशोरी पेडणेकर यांचं मुंबईतल्या गोमाता नगरमधील (Gomata Nagar) घर आणि कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) कारवाई करण्यात आली होती. गोमाता नगरमधील घर आणि कार्यालय मुंबई मनपाने ताब्यात घेतलं होतं.  

भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला होते गंभीर आरोप

वरळी गोमाता नगरमधील एसआरए प्रकल्पातील 6 गाळे किशोरी पेडणेकर यांनी हडपल्याचा आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला होता. पेडणेकर यांनी घुसखोरी करुन घराचा ताबा घेतला, दोन वर्षांपूर्वी याची तक्रार केली होती, पेडणेकर यांनी अनेक गाळे ढापले आहेत, तसंच त्यांनी कोरोना काळातही पैसे कमावले असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर वरळी येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील सदनिका लाटल्याचा आरोप आहे. तर गुन्हा दाखल झाल्यानंतर किशोरी पेडणेकरांनी ट्विट करून सोमय्यांवर निशाणा साधला आहे. एखाद्या अती शहाण्याला उत्तर देण्यापेक्षा नि:शब्द होऊन पुढे गेलं ना की, त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही असं ट्विट किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

 

तिकडे किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना

तिकडे किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झालेत. कोणताही मिया आम्हाला आमच्या महालक्ष्मी आईचं दर्शन घेण्यापासून रोखू शकणार नाही. आपण आई महालक्ष्मीचं दर्शन घेणार आणि सर्व घोटाळेबाजांवर कारवाई होईपर्यंत आपल्याला शक्ती दे अशी देवीकडे प्रार्थना करणार अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली.. ते ठाण्याहून महालक्ष्मी एक्सप्रेसनं कोल्हापूरला रवाना झाले. यावेळी ठाणे रेल्वे स्थानकात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत गर्दी केली केली होती.