कोरोनानंतर तरुणांच्या फॅशनमध्ये असे होतील बदल...

कोरोनानंतर फॅशन जगतातही मोठे बदल होणार आहेत.

Updated: May 19, 2020, 04:36 PM IST
कोरोनानंतर तरुणांच्या फॅशनमध्ये असे होतील बदल... title=
संग्रहित फोटो

प्रविण दाभोलकर, झी मीडिया, मुंबई : कोरोनानंतर शिक्षण, आरोग्य, रोजगार अशा वेगवेगळ्या क्षेत्रात महत्वाचे बदल होणार आहेत. त्याचप्रमाणे फॅशन जगतातही मोठे बदल होणार आहेत. कपड्यांच्या स्टाईलमध्येही फरक जाणवेल. वेगवेगळ्या प्रकारचे मास्क बाजारात येतील अशी माहिती फॅशन स्टायलिस्ट सारंग पाटीलने 'झी २४ तास' इंस्टा लाईव्हमध्ये दिली. सारंग पाटील हा गेली ६ वर्षे ब्लॉगर, फॅशन स्टायलिस्ट म्हणून काम करतोय. विकी कौशल, कलकी कोचिन, गुलशन दिवाडीकर, रोहीत खंडेलवाल अशा अनेक स्टार्ससोबत तो काम करत असतो.  

बेसिक शर्ट, ट्राऊसर, टीशर्ट, शूज, सनग्लास अशा वस्तूंचं छोटसं मुलांचं फॅशनचं कपाट असाव असं सारंग सांगतो. कॉटनचा सदरा जो आपण आधी घालायचो तसाच पायजमा सूट किती महत्वाचा आहे हे लोकांना आता कळायला लागलं आहे. आता गरमी असल्याने आरामदायक, कंफर्टेबल राहण्यासाठी कॉटनचे कपडे असावेत. बॉक्सर्स, टीशर्ट यांचा वापर लॉकडाऊनमध्ये होतोय.

जसे आपण सनग्लासेस घालतो तसे मास्कचे वेगवेगळे प्रकार येतील असेही सारंगने सांगितले. कपडे आपल्याकडे ठरलेले असतात फक्त त्याचं कॉम्बिनेशन कसं बदलत राहायचं याची माहिती सारंगने यावेळी दिली. यामुळे कमी खर्चात तरुणांना जास्तीत जास्त फॅशनेबल राहण्यास मदत होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#fashion #fashionblogger #styleblogger #sarangpatil #PravinDabholkar @heisgotthestyle

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas) on

अमेझॉनवर सध्या कपड्यांच्या खूप चांगल्या ऑफर्स आहेत. ज्यामध्ये तुम्हाला चांगल्या ब्रॅण्ड्सचे कपडे घेऊ शकता. ऑनलाईन कपडे घेताना अनेकजण घाबरतात. पण तुम्हाला जर तुमच्या कपड्यांचे माप पक्कं माहीती असेल, रंगाचा अभ्यास असेल तर ऑनलाईन कपडे खरेदी करण्यात अडचण येणार नाही असे सारंगने सांगितले.