मेट्रो स्टेशनवर का असतात पिवळ्या रंगाच्या खडबडीत टाइल्स?

खडबडीत टाइल्स मागचं रहस्य 

Updated: Nov 8, 2021, 11:59 AM IST
मेट्रो स्टेशनवर का असतात पिवळ्या रंगाच्या खडबडीत टाइल्स? title=

मुंबई : आपण मेट्रो स्टेशन (Metro Station) किंवा रेल्वे स्टेशन (Railway Station) वर ओबड-धोबड खडबडीत टाइल्स असतात. हे टाइल्स सरळ किंवा गोल आकाराचे असतात. मात्र या टाइल्स मेट्रो किंवा रेल्वे स्टेशनवर का लावल्या जातात तुम्हाला माहित आहेत का? अनेकांना वाटतं की प्लॅटफॉर्मवरून घसरून पडू नये म्हणून या टाइल्स लावल्या जातात. मात्र तस नाही. जाणून घ्या मेट्रो स्टेशन आणि रेल्वे स्ट्रेशनवर का असतात या टाइल्स. 

पिवळ्या रंगा मागच्या टाइल्समागील रहस्य 

मेट्रो स्टेशनवर अंध लोकांसाठी सरळ आणि गोल आकाराच्या टाइल्स बसवण्यात आल्या आहेत. या खडबडीत टाइल्सच्या मदतीने जे लोक डोळ्यांनी पाहू शकत नाहीत ते स्टेशनवर चालत जाऊ शकतात. स्टेशनवरील गोल फरशा थांबण्याचे संकेत देतात. तर सरळ फरशा म्हणजे पुढे जा. या टाइल्सच्या साहाय्याने दृष्टिहीनांना चालण्याची खूप सोय होते. या टाइल्सना टॅक्टाइल पाथ म्हणतात.

टॅक्टाइल पाथचा आणखी एक फायदा 

मेट्रो स्टेशनवर या टाइल्सचा आणखी एक फायदा आहे हे जाणून घ्या. मेट्रो स्टेशनवर एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जोडण्यासाठी अनेक प्रकारच्या केबल्स, पाईप्स आणि वायर्स बसवण्यात आल्या आहेत. या टाइल्सच्या खालून पाईप्स, केबल्स आणि वायर्स घेतल्या जातात. या कनेक्‍शनमध्ये काही अडचण आल्यास या टाईल्स सहजपणे काढून टाकून कनेक्शनमध्ये येणारी अडचण दूर केली जाते. या टाइल्स काढणे सोपे आहे. कनेक्शन निश्चित केल्यानंतर, या टाइल्स पुन्हा घातल्या जातात.