मुंबई : परप्रांतीयांविरोधात सातत्यानं आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे सोमवारी मदतीसाठी कोळी महिलांनी धाव घेतली. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जात या महिलांनी आपल्यापुढं असणाऱ्या अडचणी मांडत त्यांच्या सहकार्याची अपेक्षा केली.
डोंगरी येथील कोळी समुदायातील या महिलांची गर्दी आणि त्यांची साद ऐकत खुद्द राज ठाकरे बाहेर येत त्यांनी या महिला वर्गाची भेट घेतली. त्यांचे प्रश्नही ऐकून घेतले. ज्यानंतर अवघ्या चोवीस तासांमध्येच मनसे स्टाईलनं या महिलांच्या अडचणी दूर करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.
मनसेच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबाबची माहितीही देण्यात आली. परप्रांतीय मासे विक्रेत्यांमुळं आमचा व्यवसाय मंदावल्याचं सांगत आपल्याला त्यांचा त्रास होत आहे. कृपया यात लक्ष द्या, अशी विनंती या महिलांनी केली होती. ज्यानंतर याच गोष्टीची दखल घेत स्थानिक मनसे विभाग अध्यक्ष संजय नाईक यांनी बेकायदेशीररित्या मासेमारी करणाऱ्यांना चांगलाच दणका दिल्याचं पाहायला मिळालं.
'राजसाहेब, अनधिकृत मासेविक्रेत्यांपासून आम्हाला त्रास होतोय. त्यांचा बंदोबस्त करा', कृष्णकुंजवर येऊन कोळी भगिनींनी राजसाहेबांकडे मदत मागितली आणि स्थानिक मनसे विभागाध्यक्ष संजय नाईक ह्यांनी २४ तासात त्या बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना #मनसेदणका दिला. #आपलीमुंबई https://t.co/856h02igNo pic.twitter.com/tVdL5FT7jl
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 6, 2020
सदर परिसद #मनसेदणका देण्यापूर्वी कसा होता आणि त्यानंतर आता हा परिसर नेमका कसा आहे, याबाबतची छायाचित्रही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली. परिणामी सध्या हा मनसे पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
दरम्यान,