खंडाळ्याजवळ रेल्वे मार्गावर कोसळली दरड, लोणावळा-मुंबई वाहतूक ठप्प

रेल्वे प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम सुरु 

Updated: Aug 25, 2018, 11:35 PM IST
खंडाळ्याजवळ रेल्वे मार्गावर कोसळली दरड, लोणावळा-मुंबई वाहतूक ठप्प title=

मुंबई: खंडाळ्यात शनिवारी रात्री रेल्वे मार्गावर दरड कोसळली. मंकीहिल स्थानकानजीक हा प्रकार घडला. अप आणि मिडल लाईनवर ही दरड कोसळल्याने लोणावळ्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी ही दरड कोसळली. यामुळे कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस खंडाळा स्थानकात थांबवण्यात आली आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम सुरु आहे. या मार्गावर शुक्रवारीही दरड कोसळली होती, ती हटवण्यासाटी ६ तासांचा कालावधी लागला होता.