मुर्तीकार खातूंचा वारसा लेकीने पुढे नेला

यंदाच्या गणेशोत्सवातली पहिली मानाच्या महागणपतीची मूर्ती रेश्मा यांच्या कार्यशाळेतून बाहेर पडली.

Updated: Aug 25, 2018, 10:56 PM IST
 मुर्तीकार खातूंचा वारसा लेकीने पुढे नेला title=

मुंबई: दिवंगत सुप्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांची कन्या रेश्मा खातू हिने मोठ्या निर्धाराने गणेशमूर्ती घडवण्याचे काम सुरू ठेवले आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात रेश्मा खातू जिद्दीने आपला ठसा उमटवू पाहत आहे. 
 
 गेल्यावर्षी गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असताना विजय खातू यांचे निधन झाले होते. आता वडिलांचा वारसा पुढे यशस्वीपणे चालवण्यासाठी रेश्मा विशेष मेहनत घेत आहे. यंदाच्या गणेशोत्सवातली पहिली मानाच्या महागणपतीची मूर्ती रेश्मा यांच्या कार्यशाळेतून बाहेर पडली आहे. त्याबाबत रेश्मा यांनी समाधानाची भावना व्यक्त केली.