Salman Khan : 'सलमान हा फक्त ट्रेलर...', दाऊद इब्राहिमचा उल्लेख करत अनमोल बिश्नोईने घेतली हल्ल्याची जबाबदारी

Salman Khan Firing :  सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने (Anmol Bishnoi) घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत बिश्नोई गँगने याची जबाबदारी घेतली.

सौरभ तळेकर | Updated: Apr 14, 2024, 04:43 PM IST
Salman Khan : 'सलमान हा फक्त ट्रेलर...', दाऊद इब्राहिमचा उल्लेख करत अनमोल बिश्नोईने घेतली हल्ल्याची जबाबदारी title=
shooting outside Salman Khan Galaxy Apartment

Salman Khan Galaxy Apt Firing :  बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणाऱ्या सलमान खानच्या (Salman Khan Firing) घरावर दोन अज्ञात बाईक चालकांनी हल्ला केला. गॅलक्सी अपार्टमेंटच्या बाहेर पाच गोळ्या फायर झाल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता सलमानच्या घराबाहेरी गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने (Anmol Bishnoi) घेतली आहे. अनमोल हा लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) भाऊ आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतलीये. सलमान खान हा ट्रेलर आहे, म्हणजे तुला आमची ताकद समजेल. यानंतर गोळ्या फक्त घरावर नाही चालणार... ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग असल्याचं त्याने पोस्टमध्ये म्हटलंय. पोलिसांनी (Mumbai Police) याबाबत कोणताही दुजोरा अद्याप दिलेला नसून मात्र मोठ्या प्रमाणात या पोस्टची चर्चा होतेय.

अनमोल बिश्नोईने पोस्टमध्ये काय म्हटलंय?

जय श्री राम... जय गुरु भवेश्वर... जय गुरु दयानंद सरस्वती... जय भारत... आम्हाला शांतता हवी आहे. दडपशाहीविरोधात निर्णय युद्धातून आला तर युद्ध योग्य आहे. सलमान खान आम्ही तुला फक्त ट्रेलर दाखवलाय, कारण तुला आता समजेल की आमची ताकद काय आहे. आम्हाला हलक्यात घेऊ नको. आम्ही तुला पहिला आणि अखेरची वॉर्निंग देतोय. यानंतर गोळ्या घरावर चालणार नाही. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील ज्यांना तुम्ही देव मानता त्या नावाने आम्ही दोन कुत्रे पाळले आहेत. आपल्याला जास्त बोलायची सवय नाही, असं म्हणत अनमोल बिश्नोईने सलमान खानला धमकी दिली आहे. 

दबंग खान सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या इमारतीच्या बाहेर हा गोळीबार झालाय. पहाटे 5 च्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती बाईकवरुन आल्या आणि त्यांनी सलमानच्या घराबाहेर चार राऊंड फायर केले. त्यानंतर दोन्ही आरोपी फरार झालेत. दरम्यान पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम घटनास्थळी दाखल झाली असून सीसीटीव्ही फुटेज तपासणीचं काम सुरु आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यानं सलमानला मारण्याची धमकी दिलीये. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या गोळीबारामुळे सलमानच्या घराबाहेर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीये. 

दरम्यान, सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानला फोन करून त्याची विचारपूस केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर आरोपींना सोडणार नसल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणालेत. त्याचबरोबर  मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्याचीही सूचना केल्याचंही ते म्हणालेत.