Loksabha Nivdnuk Nikal 2024 : मुंबईत ठाकरे गटाचा पहिला विजय, अनिल देसाईंनी मारली बाजी

लोकसभा निवडणूक 2024 निकाल समोर आले आहेत. मुंबईत ठाकरे गटाचा पहिला विजय झाला आहे. मुंबईत दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांचा विजय झाला आहे.     

Updated: Jun 4, 2024, 03:06 PM IST
Loksabha Nivdnuk Nikal 2024 : मुंबईत ठाकरे गटाचा पहिला विजय, अनिल देसाईंनी मारली बाजी title=

Mumbai South Central Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणूक 2024 निकाल समोर आले आहेत. मुंबईत ठाकरे गटाचा पहिला विजय झाला आहे. मुंबईत दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांचा विजय झाला आहे. तर, शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंचा दारुण पराभव झाला आहे.

मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईचा मतदारसंघातून शिवसेनेकडून राहुल शेवाळे तर शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई मैदानात उतरले होते. या मतदारसंघातही दोन शिवसैनिकांमधील कडवट लढत पाहायला मिळाली. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असल्यामुळं हा मतदारसंघ चर्चेत आला होता.  अनिल देसाई यांना 3 लाख 78 हजार 026 मतं मिळाली आहेत. तर राहुल शेवाळे यांना 3 लाख 26 हजार 895 मतं मिळाली आहेत. राहुल शेवाळे यांचा तब्बल 51 हजार मतांनी पराभव झाला आहे. 

अनिल देसाईंच्या गळ्यात विजयाची माळ

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे आघाडी टिकवून होते. मात्र, त्यानंतर अनिल देसाईंनी मोठी आघाडी घेत राहुल शेवाळेंना पिछाडीवर टाकलं. पक्षफुटीनंतर ही पहिली निवडणूक असल्यामुळे ठाकरे आणि शिंदे दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. अशातच मतदारराजानं ठाकरेंच्या बाजूनं कौल देत अनिल देसाईंच्या गळ्यात विजयाची माळ घातली. 

दक्षिण मध्य मुंबईत मतदानाचा टक्का घसरला

दरम्यान मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये 55.2 टक्के मतदान झालं होतं. यंदा टक्का वाढवण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोर लावण्यात आला होता, पण त्याचा फारसा फरक पडला नाही. त्याउलट यंदा 1.62 टक्के मतदान कमी झालं. यंदाच्या निवडणुकीत केवळ 53.60 टक्के मतदान झालं.