Jet Airways च्या पायलटने महिला सहकर्मचाऱ्याला कानाखाली मारली

जेट एअरवेजचं पुन्हा एकदा नाव चर्चेत आलं आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 3, 2018, 11:56 PM IST
Jet Airways च्या पायलटने महिला सहकर्मचाऱ्याला कानाखाली मारली  title=

मुंबई : जेट एअरवेजचं पुन्हा एकदा नाव चर्चेत आलं आहे. 

जेट एअरवेजच्या उडानादरम्यान अनुसुचित प्रकार घडल्यामुले दोन पायलटला कामावरून काढण्यात आलं आहे. लंडनहून 1 जानेवारी रोजी मुंबईत आलेल्या विमानातील एका पुरूष पायलटने आपल्या महिला सहकर्मचाऱ्याला कानाखाली वाजवली असल्याची घटना घडली आहे. 

कंपनीतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी हे विमान ईरान - पाकिस्तानच्या सीमेवर होते. संपर्क केल्यावर कंपनीच्या प्रवक्तांनी सांगितले की, दोघांमध्ये गैरसमज झाल्यामुळे हा प्रकार घडला. मात्र आता हे प्रकरण आता संपल आहे. त्यांचा गैरसमज दूर झाला आहे. 

डीसीजीएने सांगितले आहे की, या वेळी महिला सहकर्मचाऱ्यांना कानाखाली मारलेल्या एअर वेजच्या वरिष्ठ पायलटचे विमान उडवण्याचे लायसेंस रद्द करण्यात आले आहे. आरोपी पायलटचे लायसन्स निलंबित करण्यात आलं आहे. या अगोदरही असेच दोन पायलटला कर्मचाऱ्यांना ड्यूटीहून काढून टाकले आहे.