अखेर कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर

मार्च ते एप्रिल या तीन महिन्यांत कर्जमाफीच्या योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.

Updated: Feb 24, 2020, 03:32 PM IST
अखेर कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर title=

मुंबई: ठाकरे सरकारने घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये ६८ गावांतील दोन लाखांपर्यंतचे कर्ज असलेल्या १५,३५८ शेतकऱ्यांची नावे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी यासंदर्भातील घोषणा केली होती. त्यानुसार आज कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांची नावे जाहीर झाली. 

आता दुसरी यादी २८ फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल. सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावे कर्जमाफीसाठी निवडण्यात आली आहेत. याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, हे पाहून कर्जमाफीची पुढील यादी प्रसिद्ध होती. मात्र, मार्च ते एप्रिल या तीन महिन्यांत कर्जमाफीच्या योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. 

'भाजपने वारेमाप आरोप करू नयेत, समजुतदार विरोधी पक्षाप्रमाणे वागावे'
 
याशिवाय, राज्य सरकारने कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी आतापर्यंत ३४,८३, ९०८ खात्यांची माहिती संग्रहित केली आहे. अजूनही १ लाख ६१ हजार खात्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 
 
पहिली यादी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर, परभणी, अमरावती व पुणे जिल्ह्यातील प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या जिल्ह्यांतील दोन पात्र लाभार्थी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.