Maharashtra Corona Update : राज्याला कोरोनाचा धोका कायम, दिवसभरात किती पॉझिटिव्ह?

राज्यात दररोज वाढणारा कोरोना कमी होण्याचं (Maharashtra Corona Update) नाव घेत नाहीये.  

Updated: Jun 11, 2022, 08:01 PM IST
Maharashtra Corona Update : राज्याला कोरोनाचा धोका कायम, दिवसभरात किती पॉझिटिव्ह? title=

मुंबई : राज्यात दररोज वाढणारा कोरोना कमी होण्याचं (Maharashtra Corona Update) नाव घेत नाहीये. त्यामुळे राज्य सरकारच्या चिंता कायम आहे. राज्यासह मुंबईच्या रुग्णसंख्येत आज (11 जून) किंचीतशी घट झाली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला चिंताजनक बाब अशी की सक्रीय रुग्णांचा आकड्यात वाढ कायमच आहे. तर  एकाचा मृत्यू झाला आहे. (maharashtra corona update 11 june 2022 today 2 thousand 922 positive patients found in state active patients incresed)

राज्यात किती पॉझिटिव्ह?

राज्यात आज शनिवारी शुक्रवारच्या तुलनेत राज्यासह मुंबईतील रुग्णसंख्येत घट झाली आहे. राज्यात आज कोरोनाचे 2 हजार 922 नवे रुग्ण सापडले आहेत. तर मुंबईत 1 हजार 745 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी राज्यातला हा आरडा 3 हजार 81  इतका होता. तर मुंबईत 1 हजार 956 जण कोरोनाबाधित आढळले होते. 

दिवसभरात किती बरे? 

राज्यात दिवसभरात 1 हजार 392 रुग्णांना कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण कोरनामुक्त झालेल्यांचा आकडा हा 77 हजार 44 हजार 905 इतका झाला आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 97. 94 टक्के इतका झाला आहे. 

सक्रीय रुग्ण किती?

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा चिंताजनक आहे. राज्यात आज 14 हजार 858 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर शुक्रवारी सक्रीय रुग्णांचा आकडा 13 हजार 229 इतका होता.

राज्यातील कोरोनाची दैनंदिन आकडेवारी 

शनिवार 11 जून : 2 हजार 922

शुक्रवार 10 जून  : 3 हजार 81 

गुरुवार 9 जून : 2 हजार 813 

बुधवार 8 जून :  2 हजार 701 

मंगळवार 7 जून : 1 हजार 881 

सोमवार 6 जून :  1 हजार 36  

रविवार 5 जून : 1 हजार 494

शनिवार 4 जून :  1 हजार 357

शुक्रवार 3 जून : 1 हजार 134 

गुरुवार 2 जून : 1 हजार 45

बुधवार 1 जून : 1 हजार 81