Rajesh Tope | राज्यातील कोरोना निर्बंध केव्हापर्यंत शिथिल होणार? पाहा काय म्हणाले आरोग्यमंत्री

राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Corona Guidelines) निर्बंध लावण्यात आले. हे निर्बंध केव्हा शिथिल होणार, याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे.    

Updated: Jan 12, 2022, 07:23 PM IST
Rajesh Tope | राज्यातील कोरोना निर्बंध केव्हापर्यंत शिथिल होणार? पाहा काय म्हणाले आरोग्यमंत्री title=

मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना रुग्णांच्या आकडयात (Maharashtra Corona Update) मोठी वाढ झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 46 हजार रुग्णांच निदान झालं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांनी याबाबतची माहिती दिली. कोरोना रुग्णांची संख्या घटना आहे, असं समजू नये, असा इशाराही आरोग्यमंत्री टोपे यांनी दिला. तसेच राज्यातील कोरोना परिस्थितीचा माहितीही त्यांनी जनतेला दिली. आरोग्यमंत्री मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.  (maharashtra corona update health minister rajesh tope reaction over to state and other districts corona conditons)

राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

"दोन दिवस केसेस कमी आले म्हणून आलेख खाली जातोय या भ्रमात राहू नये. आजही 46 हजार रुग्ण आढळले आहेत. पॉझिटिव्हीटी रेट राज्याचा 21.4 टक्के आणि मुंबईचा 27 टक्क्याच्या पुढे आहे. कोरोनाचे 2 लाख २५ हजाराच्या घरात सक्रिय रुग्ण आहेत", अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.  

कोरोना रुग्णांची आकडेवारी

"कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी 86 टक्के लोक घरी किंवा कोविड सेंटरमध्ये विलगीकरणात आहेत. उर्वरित 14 टक्क्यात आयसीयूमध्ये 1 टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण आहेत. ऑक्जिजन बेडवर 1.89 टक्के आहेत. तर 2.8 टक्के गंभीर रुग्ण आहेत" 

मृत्यूदर किती? 

राज्याचा मृत्यूदर डिसेंबरमध्ये .५० टक्के इतका होता. तो आता जानेवारीत 0.30 टक्के इतका आहे. तसेच दररोज 2 लाख आरटीपीसीआर टेस्ट करण्याची क्षमता आहे. आपण ती करतोय. तसेच रॅपिड एन्टीजन टेस्ट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत", असंही टोपे यांनी यावेळेस स्पष्ट केलं.   

नागरिकांना आवाहन 

"लोकं घरी टेस्ट करतायत त्यांचा डेटा मिळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लक्षणं नसलेल्यांना घरी विलीगीकरणात ठेवण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घरच्या घरी कोरोना टेस्ट करणाऱ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांनी जवळच्या केंद्राला कळवावं", असं आवाहनही त्यांनी केलं. 

"लसीकरण कमी होतंय" 

राज्यातील लसीकरणावरुन टोपे यांनी प्रतिक्रिया दिली. "लसीकरण दर कमी होताना दिसत आहे. दररोज 6 लाख 50 हजार लोकांचं लसीकरण होतंय. तर कमाल 8 लाख लोकांना लस मिळतेय. लसीकरणाला वेग दिल्या आहेत", असं आरोग्यमंत्री म्हणाले. 

राज्यातील लसवंताची टक्केवारी 

"राज्यात आतापर्यंत 67 टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर  90 टक्के लोकांचं एक डोस पूर्ण झाला आहे. तसेच 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षाखालील वयोगटातील 35 टक्के मुलाचं लसीकरण झालंय", असं टोपेंनी सांगितंल. 

लसी कमी पडतायेत 

कोव्हॅकिसन अणि कोविशिल्ड लस कमी पडतेय त्याबाबत मुख्यमंत्रीकडून मागणी केली जाणार आहे. कोव्हॅकसिन आपण लहान मुलांना देतोय, त्याची मागणी जास्त आहे. आपल्याला कोव्हॅकसिनच्या ६० लाख आणि कोविशिल्डच्या ४० लाख लसींची गरज असल्याचं टोपेंनी सांगितलं. 

शाळांबाबतचा निर्णय काय? 

शाळांबाबत मंत्रीमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शाळा अजून 15 ते 20 दिवस शाळा बंदच ठेवाव्या असं ठरलं. त्यानंतर आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. 

लॉकडाऊन केव्हा?

"राज्याला आज ऑक्सिजनची मागणी ४०० मेट्रीक टन इतकी आहे. यापैकी 250 नॉन कोविड आणि 150 मेट्रीक टन कोविड रुग्णांसाठी लागत आहे. ऑक्सिजनची मागणी 700 टनवर गेली, की आपण लॉकडाऊन लावणार आहोत" असं टोपेंनी ठणकावून सांगितलं.