close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

संजय दत्तनंतर मिथुन चक्रवर्तींचा आदित्य ठाकरेंना पाठिंबा

विधानसभा निवडणूक २०१९ अगदी काही दिवसांवर येवून ठेपली आहे. 

Updated: Oct 18, 2019, 07:06 PM IST
संजय दत्तनंतर  मिथुन चक्रवर्तींचा आदित्य ठाकरेंना पाठिंबा

मुंबई : महाराष्ट्रात सर्वत्र फक्त विधानसभा निवडणुकीचा माहोल आहे. विधानसभा निवडणूक २०१९ अगदी काही दिवसांवर येवून ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष जोरदार शक्ती प्रदर्शन करताना दिसत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्ष नवनव्या युक्त्या लढवताना दिसत आहे. यंदाची विधानसभा निवडणूक शिवसेनेसाठी फार महत्वाची आहे. 

करण ठाकरे कुटुंबातील पहिला सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या समर्थनाकरता सेलिब्रिटी देखील मैदानात उतरले आहेत. 

अभिनेता संजय दत्तनंतर बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आदित्य ठाकरे यांचे समर्थन केले आहे. मिथुन यांनी मतदारांना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मत देण्यासाठी विनंती केली आहे. त्याचप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझ्यासाठी माझ्या वडिलांप्रमाणे होते, असं वक्तव्य देखील मिथुन चक्रवर्ती यांनी केले आहे. 

याआधी अभिनेता संजय दत्तने आदित्य ठाकरेंना पाठिंबा देत एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. 'बाळासाहेब ठाकरेंनी मला आणि माझ्या कुटुंबाला खूप सपोर्ट केला आहे. बाळासाहेब मला माझ्या वडिलांप्रमाणे होते. हे मी कधीच विसरू शकत नाही', असं संजय दत्त या व्हिडिओत म्हणाला.'

त्याचप्रमाणे आदित्य माझ्या लहान भावासारखा आहे असे देखील संजय या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे.