Good News राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज दिली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ जानेवारी २०१७ पासून देण्यात येणार आहे.

Updated: Sep 21, 2017, 07:12 PM IST
Good News राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ title=

मुंबई : राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज दिली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ जानेवारी २०१७ पासून देण्यात येणार आहे.

ऑगस्टपासूनचा वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात दिला जाईल. तर त्यापूर्वीच्या ७ महिन्यांमधील वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे द्यायचा, याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे.

यापूर्वी एप्रिल महिन्यातही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सात टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. त्यावेळी महागाई भत्ता १३२ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता. आता त्यामध्ये आणखी चार टक्क्यांची भर पडली आहे. राज्य सरकारचे तब्बल १६ लाख कर्मचारी आणि ६ लाख निवृत्ती वेतनधारकांना वाढीव महागाई भत्त्याचा फायदा होणार आहे.