दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यात यंदा तीव्र दुष्काळ असताना सरकारकडे आपत्ती व्यवस्थापन खात्यात दुष्काळावर खर्च करण्यासाठी पैसाच शिल्लक नसल्याचे समोर आले आहे. दुष्काळ निवारणासाठी केंद्राने दिलेला निधी इतर कामांसाठी फस्त करण्यात आलाय. त्यामुले दुष्काळावर खर्च करायला राज्याकडे पैसेच नाहीत, अशी धक्कादायक माहिती पुढे आलेय.
राज्य सरकारने राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निधीसाठी स्वतंत्र खातेच उघडले नसल्याने २०१५ पासून केंद्र सरकारकडून आपत्ती व्यवस्थानासाठी आलेले १३ हजार पाचशे कोटी रुपये इतरत्र खर्च झाल्याचं समोर आले आहे. त्यामुळे आता दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे निधीची मागणी केली जातेय. याप्रकरणी मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर ही बाब समोर आली आहे.
राज्याचे नियोजन फसले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कशी मदत मिळणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. २०१५ रोजी एक केंद्राचा जीआर आहे. मात्र, या जीआरला फाटा देण्यात आले आहे. दुष्काळासाठी आलेला १३ हजार ५०० कोटी निधी हा अन्य ठिकाणी खर्च करण्यात आला. त्यामुळे आता राज्यात दुष्काळाचे संकट ओढवलेय. त्यामुळे पैसे नसल्याने दुष्काळाचे सावट अधिक गंभीर होणार आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर दुष्काळ निवारण्यासाठी पैसे नसल्याचे बाब पुढे आले. त्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलेय. तर दुसरीकडे राज्याच्या मुख्य सचिवांवर कारवाई होऊ शकते, तसे न्यायालयाने नोटीस बजावता म्हटलेय.