Maharashtra HSC Result : बारावीचा निकाल 99.63 टक्के

या लिंकवर पाहाता येणार निकाल 

Updated: Aug 3, 2021, 03:32 PM IST
Maharashtra HSC Result : बारावीचा निकाल  99.63 टक्के

मुंबई : राज्य मंडळातर्फे बारावीचा निकाल मंगळवारी (3 ऑगस्ट) दुपारी चार वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी बारावीचा निकाल  99.63 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाव 99.45 टक्के लागला आहे. तर कला शाखेचा निकाल  99.83 टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेचा निकाव 99.91 लागला असून माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम ९८.८० टक्के आहे. महत्त्वाचं म्हणजे 35 टक्के मिळालेले 12 विद्यार्थी आहेत. 

100 टक्के गुण मिळालेले 46 विद्यार्थी आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.7 टक्क्यानी निकाल वाढला आहे. यांदाच्या वर्षी देखील विद्यार्थिंनी बाजी मारली आहे.  99.73 टक्के विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या आहेत. 99.54 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

कुठे पाहाल निकाल
https://hscresult.net

11admission.org.in

https://msbshse.co.in

maharesult.nic.in

hscresult.mkcl.org