Maharashtra Unlock: कोणती दुकानं किती वाजेपर्यंत सुरु राहणार, जाणून घ्या

दुकानदार आणि व्यापारी संघटना सातत्याने वेळ वाढवून देण्याची मागणी करत आहेत. 

Updated: Aug 2, 2021, 10:31 PM IST
Maharashtra Unlock: कोणती दुकानं किती वाजेपर्यंत सुरु राहणार, जाणून घ्या title=

मुंबई : कोरोनाची प्रकरणे कमी झाल्यानंतर महाराष्ट्रातही अनलॉक सुरु झाले आहे. महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे कमी रुग्ण आहेत. त्या जिल्ह्यात आता दुकाने रात्री 8 पर्यंत उघडी राहतील. सांगली दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत संकेच दिले होते. 

दुकानदार आणि व्यापारी संघटना सातत्याने वेळ वाढवून देण्याची मागणी करत आहेत. ज्या भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी आहे तेथे सर्व दुकाने उघडली पाहिजेत. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर सर्व दुकानदार आणि व्यापारी खूश झाले आहेत. याआधी सध्या दुकाने फक्त 4 वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी होती.

याआधी 30 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांसोबत कोविड टास्क फोर्सच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आले होते की, राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये जिथे कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी आहेत, तेथे लॉकडाऊन निर्बंध शिथिल केले जातील. त्याच वेळी, गरज पडल्यास 11 जिल्ह्यांमधील निर्बंध वाढवले ​​जातील, कारण तेथे कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत.

सरकार संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सर्व प्रकारची खबरदारी घेत आहे. कर्नाटक आणि केरळमध्ये कोरोनाची झपाट्याने वाढणारी प्रकरणे पाहता महाराष्ट्र सरकारही पावले उचलत आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते की, 'आवश्यक असल्यास, स्थानिक अधिकारी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी (या भागात) अधिक कठोर निर्बंध लावू शकतात.'