मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला तारलं? सभा घेतलेल्या ठिकाणी उमेदवार आघाडीवर

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : देशाच्या लोकसभा निवडणूकीत मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. निवडणुकीच्या आधी एनडीएने चारशे पारचा नारा दिला होता. पण निकालानंतर एनडीएला तीनशेच्या आत समाधान मानावं लागलंय. तर महाराष्ट्रातही भाकरी फिरलीय.

कृष्णात पाटील | Updated: Jun 4, 2024, 12:35 PM IST
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला तारलं? सभा घेतलेल्या ठिकाणी उमेदवार आघाडीवर title=

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसताना दिसतोय. प्राथमिक कलानुसार राज्यातील 48 जागांपैकी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) 28 जागांवर आघाडी आहे. तर महायुतीला (Mahayuti) 19 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. पण यातही विशेष  म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray_ यांनी महायुतीलाल तारल्याचं चित्र आहे. राज ठाकरे यांनी सभा घेतलेल्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. राज ठाकरे यांनी महायुतीला दिला होता बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे यांनी सभा घेतल्या.

या ठिकाणी घेतल्या होत्या सभा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे तसंच कल्याण डोंबिवली आणि पुणे मतदार संघात  राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतल्या होत्या. रत्नागिरी-सिंधुदुर्गातून नारायण राणे,  ठाण्यात नरेश मस्के, कल्याण-डोंबिवलीतून श्रीकांत शिंदे तर पुण्यातून मुरलीधर मोहळ आघाडीवर आहेत. या सर्व मतदार संघात राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतल्या होत्या. 

राज ठाकरे यांचा बिनशर्त पाठिंबा
शिवाजी पार्कावर झालेल्या (Shivaji Park) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भव्य गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी  लोकसभा निवडणुकीसाठी मनसेची भूमिका जाहीर केली होती. वसांपासून राज ठाकरे देखील महायुतीमध्ये सामील होणार का? असा सवाल विचारला जात होता. अशातच आता शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. (Raj Thackeray Announced support Mahayuti) भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याची घोषणा त्यांनी केली होती.