'खोके सरकारवर गुंतवणूकदारांचा विश्वास नाही...' आदित्य ठाकरे यांचा घणाघात

'राज्यातील चौथा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला, शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह'

Updated: Oct 28, 2022, 01:57 PM IST
'खोके सरकारवर गुंतवणूकदारांचा विश्वास नाही...' आदित्य ठाकरे यांचा घणाघात title=

Aditya Thackeray on Shinde Government : खोके सरकारवर उद्योजकांचा विश्वास राहिलेला नाही, जो माणूस निवडणुकांना सामोरं जाऊ शकत नाही तो गुंतवणूक काय आणणार घणाघात आदित्य ठाकरे  (Aditya Thackeray) यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde Government)  केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री नेहमी दहीहंडी, मंडळं, राजकीय फोडाफोडी यात व्यस्त आहेत, कधी दुसऱ्या राज्यात जाऊन त्यांनी प्रकल्पांचा आढावा घेतला का असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

'राज्यातील चौथा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेला'
राज्यातील चौथा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेला. पण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना वेदांता फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn) प्रमाणे एअरबसचा प्रकल्पही माहिती नव्हता का? कशाच्या आधारे त्यांनी ही वक्तव्ये केली होती, असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी मंत्री सामंत यांच्या वर हल्लाबेल केला. फॉक्सकॉन-वेदांता नंतर आता C-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट हा प्रकल्पही महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातला नेण्यात आला. यावरुनआदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. गुजरातमध्ये (Gujrat) वडोदऱ्याला हा प्रकल्प होणार असून 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे.

चार प्रकल्प आपल्या हातातून गेले, मी सुभाष देसाईंसोबत काम करत असताना एक समिती निर्माण केली होती. 2020 पासून 2022 पर्यंत राज्यात साडेसहा हजार कोटींची गुंतवणक झाली. शेतकऱ्यांना कृषीमंत्री कोण आहेत माहिती नाही. केंद्रात आणि राज्यात त्यांचच सरकार असताना प्रकल्प राज्याबाहेर जातात कसे, असा सवाल उपस्थित करत उद्योजकांना उद्योजक कोण आहे हे माहिती नाहीत. या खोके सरकारवर कोणत्याही उद्योजकाचा विश्वास राहिला नाही. म्हणून प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. जो माणूस निवडणुकीला सामोरे जायला तयार नाही, तो गुंतवणूक काय आणणार, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे