दहावीचा निकाल आज? सोशल मीडियावर मेसेज व्हायरल

शिक्षण मंडळाकडून आज संध्याकाळपर्यंत निकालाची तारीख जाहीर केली जाऊ शकते.

Updated: Jun 6, 2019, 03:11 PM IST
दहावीचा निकाल आज? सोशल मीडियावर मेसेज व्हायरल title=

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात दहावीच्या परीक्षेच्या निकालाबाबत सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. यापैकी काही मेसेजेस प्रचंड व्हायरल झाले असून त्यामध्ये सहा जूनला म्हणजे आज दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आतापर्यंत शिक्षण मंडळाकडून याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. 

त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. निकाल नेमका कधी लागणार याबबात सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, शिक्षण मंडळाकडून आज संध्याकाळपर्यंत निकालाची तारीख जाहीर होईल व उद्या म्हणजे शुक्रवारी निकाल जाहीर होईल. परंतु, याबाबत शिक्षण मंडळाने कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे तुर्तास या सगळ्या बातम्या म्हणजे अफवाच असल्याचे सांगितले जात आहे. 

गेल्यावर्षी दहावीचा निकाल ८ जून रोजी लागला होता. त्यामुळे यंदाही दहावीच्या निकालाची तिच तारीख निवडली जाऊ शकते आणि कदाचित बारावीचा निकाल जसा दोन दिवस आधी लागला तसाच दहावीचा निकालही आधी लागू शकतो.   www.maharashtraeducation.com या संकेतस्थळावर दहावीचा निकाल पाहता येणार आहे.

मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर या नऊ विभागीय मंडळांतर्फे एक मार्च ते २२ मार्चदरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यभरातून १७ लाखांपेक्षा आधिक विद्यार्थी बसले होते.