मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यानी आनंदाने उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली, असं काही वाटत नाही. त्यांचा चेहराही सांगत होता. पण ते नाखुष आहेत, आणि नागपूरमध्ये त्यांनी स्वंयसेवक म्हणून काम केलं आहे. आदेश आल्यावर ते पाळायचे असतात असा त्यांच्यावर संस्कार असावेत. त्याचा परिणाम त्यांनी हे स्विकारलं, अशी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीवर प्रतिक्रिया दिली. (maharashtra political crisis devendra fadnavis face was telling he didnt look happy says sharad pawar)
"संघाच्या कार्यपद्धतीमध्ये आदेश दिल्यानंतर तो आदेश तंतोतंत पाळावा लागतो त्याचं उत्तम उदाहरण जे मुख्यमंत्री होते, पाच वर्ष ज्यांनी काम केलं, नंतर विरोधी पक्षाचं नेतृत्व ज्यांनी केलं, त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. हा आश्चर्यचा धक्का दिला. पण एकदा आदेश मिळाला आणि सत्तेची संधी मिळाली की ती स्विकारायची असते, याचं उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी आज घालुन दिलेलं आहे", असंही पवार यांनी स्पष्ट केलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
"या दोन्ही गोष्टी कुणालाच माहिती नव्हत्या. पण ते खरं ठरलं. एकदा मुख्यमंत्रीपदावर गेल्यानंतर अन्य पदं स्विकारण्याची उदाहरणं महाराष्ट्रात यापूर्वी होती. शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात मी मंत्री होतो, पण जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा शंकरराव चव्हाण माझ्या मंत्रीमंडळात सहभागी झाले. शिवाजीराव निलंगेकर मुख्यमंत्री होते. नंतर मंत्री झाले. अशोक चव्हाण मुख्यंत्री होते, नंतर त्यांनी मंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली अशी उदाहरण महाराष्ट्रात स्विकारली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची स्विकृती मला आश्चर्यकारक वाटली नाही", असं पवार यांनी नमूद केलं.
"राष्ट्रवादी-काँग्रेसमुळे बाहेर पडलो हे सर्व खोटं आहे, पण लोकांसमोर काहीतरी सांगायला हवं त्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं नाव घेतलं जात आहे. त्याला अन्य कारणं असण्याची शक्यता आहे", असंही पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं.