Eknath Shinde : एकनाथ शिंदेची मोठी खेळी, शिवसेनेला सुरुंग लावण्यासाठी 'ऑपरेशन मुंबई'

काही दिवसांवर मुंबई महापालिकेच्या निवडणुका आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मुंबईत जोरदार झटका देण्याची तयारी केलीय.

Updated: Aug 2, 2022, 06:13 PM IST
Eknath Shinde : एकनाथ शिंदेची मोठी खेळी, शिवसेनेला सुरुंग लावण्यासाठी 'ऑपरेशन मुंबई' title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे अनेक नेते, पदाधिकारी हे एकनाथ शिंदे गटात सामील होत आहेत. मात्र तरीही शिवेसेनेचे मुंबईतील पदाधिकारी हे शिंदे गटाच्या गळाला लागलेले नाही. अवघ्या काही दिवसांवर मुंबई महापालिकेच्या निवडणुका आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मुंबईत जोरदार झटका देण्याची तयारी केलीय.(maharashtra political crisis eknath shinde group mission mumbai over to upcoming bmc election 2022)

शिंदे गटाने मुंबईतील शिवसेनेचे पदाधिकारी फोडण्यसाठी 'ऑपरेशन मुंबई' हाती घेतल्याचं समजतंय. मुंबईतील शिवसेनेच्या बंडखोरी केलेल्या 5 आमदारांवर नगरसेवक फोडण्याची जबाबदारी देण्यात आल्याचंही समजतंय.

शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक फोडण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येणार आहेत. मुंबईतल्या  बंडखोर आमदाराला प्रत्येकी चार ते पाच माजी नगरसेवकांना शिंदे गटात आणण्याची जबाबदारी देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील प्रत्येक बंडखोर आमदाराला प्रत्येकी चार ते पाच माजी नगरसेवकांना शिंदे गटात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबईतील मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, सदा सरवणकर, दिलीप लांडे हे पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. या पाच जणांवर एकनाथ शिंदे यांनी 'ऑपरेशन मुंबई'ची जबाबदारी दिल्याचं समजतंय.