महायुतीत महाभारत! 'लोकसभेत तुमचा लंगोट मी वाचवला' शिवसेना नेत्याचा राष्ट्रवादीवर निशाणा

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत महाभारत सुरु झालं आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्यामुळे रायगड जागा मिळाल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे.

राजीव कासले | Updated: Jun 20, 2024, 07:21 PM IST
महायुतीत महाभारत! 'लोकसभेत तुमचा लंगोट मी वाचवला' शिवसेना नेत्याचा राष्ट्रवादीवर निशाणा title=

Maharashtra Politics :  लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीत  (Mahayuti) महाभारत सुरु झालं आहे. शिंदे गट (Shivsena Shinde Group) आणि अजित पवार गट (Ajit Pawar Group) आमने सामने आले आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी (Ramdas Kadam) लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभवाचं खापर अजित पवार गटावर फोडण्याचा प्रयत्न केला. अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चालले असते, असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवार गटात प्रचंड नाराजी पसरल्याचं दिसतंय. 

'वक्तव्याचा विपर्यास केला गेला'
वक्तव्यावरुन वाद झाल्यानंतर रामदास कदम यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, अजितदादा थोडेसे उशिरा आले असते तर नऊ मंत्रीमंडळं जी त्यांनी मिळाली ती आम्हाला मिळाली असती असं माझं म्हणणं होतं, असं रामदास कमद यांनी म्हटलंय. आम्हाला महायुतीत टीकवायची आहे. कुठेही मिठाचा खडा टाकायचा नव्हता असंही रामदास कदम यांनी म्हटलंय.

मिटकरींवर साधला निशाणा
मोल मिटकरी यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर जहरी टीका केली. याला उत्तर देताना मिटकरी यांची औकाद आहे का माझ्यासमोर बोलण्याची, त्याचं वय काय, काय बोललो ते आधी जाणून घ्यायला हवं होतं. लंगोटची भाषा त्यांच्यासारख्यांनी करू नये असं रामदास कदम यांनी म्हटलंय. 

राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा आली सुनील तटकरेंची, ती सुद्धा रामदास कदममुळे आली, तुमचा लंगोट मी वाचवला, नाहीतर लोकांसमोर तुम्ही वेगळे उभे राहिला असता, बारामतीमध्ये तुमची अवस्था काय झाली. दुसऱ्यांकडे बोट दाखवणयाची तुमची हिमत आहे का? असा सवाल रामदास कदम यांनी मिटकरी यांना विचारला आहे. मिटकरी हा बिचकुला आहे माझ्यावर बोलण्याची त्याला अजून वेळ आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

रायगडमध्ये राष्ट्रवादीची इज्जत भाजपने वाचवली. लोकसभा निवडणुकीत भाजपने धैर्यशील पाटील यांना तिकिट देऊन कामाला लावलं होतं, पण भाजपकडून सुनील तटकरेंसाठी ती जागा मी भांडून घेतली, असा दावाही रामदास कदम यांनी केला आहे. 

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
दरम्यान, शिवसेनेच्या वर्धापण दिनात बोलताना रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा विसर पडला, ज्या शिवसेनाप्रमुखांनी ख्याती मिळवली त्यांच्या मुलाने हिंदुत्वाला काळं फासलं, हा शिवसेनाप्रमुखांचा मुलगा त्याल लाज वाटली पाहिजे काँग्रेसला मत देताना, काँग्रेसने फक्त मतांसाठी मुस्लिमांना वापरलं, उद्धव ठाकरे तुम्ही चुकलात, फसलात असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.