Shivsena Symbol : शिवसेना शिंदेंची, धनुष्यबाणही शिंदेंचंच! महाराष्ट्रात आता ठाकरेंविना शिवसेना

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि शिवसेनेच्या इतिहासात 17 फेब्रुवारी हा दिवस कायमचा लक्षात ठेवला जाईल

Updated: Feb 17, 2023, 10:29 PM IST
Shivsena Symbol : शिवसेना शिंदेंची, धनुष्यबाणही शिंदेंचंच!  महाराष्ट्रात आता ठाकरेंविना शिवसेना title=

Maharashtra Politics : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा निकाल लागलाय.. 'धनुष्यबाण' हे चिन्ह (Dhanushyaban Symbole) आणि 'शिवसेना' (Dhanushyaban) हे पक्षाचं नाव ठाकरे कुटुंबाकडून (Thackeray Family) कायमचं निसटलंय.. जे नाव आणि जे चिन्हं ठाकरेंची ओळख होती.. ते आता शिंदेंच्या (CM Eknath Shinde) मालकीचं झालंय. निवडणूक आयोगानं (Election Commission) शिवसेना नाव आणि चिन्हावर निर्णय दिला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली.. आजवर अनेक नेत्यांनी शिवसेना सोडली....बंड केलं....बाहेरच्यांसोबत घरातूनही बंड झाली. मात्र शिंदेंच्या बंडानं ठाकरेंच्या अस्तित्वावर घाला घातला अन् आता तर शिवसेना नाव आणि शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण ही ओळखच आता ठाकरेकडून हिरावली गेलीय. 

शिवसेनेनं किती बंड पचवली?

1991 मध्ये छगन भुजबळांनी शिवसेना सोडली, त्यांच्यासोबत 6 आमदार फुटले

1995 युतीची सत्ता असताना गणेश नाईकांची पर्यावरणमंत्रीपदावर बोळवण, नाराजीतून शिवसेना सोडली

 2005 मध्ये नारायण राणेंनी डझनभर आमदारांसह शिवसेना सोडली

2006 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, राज ठाकरेंसोबत आमदार-खासदार फुटले नाहीत मात्र 2009 च्या निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले

हे ही वाचा : Shivsena Symbol : पक्ष गेला, चिन्ह गेलं आता सेना भवन कोणाचं? मोठा प्रश्न

या साऱ्यांची बंड महाराष्ट्रानं पाहिली आणि शिवसेनेनं पचवली.. अशा बंडांनंतर शिवसेना संपली नाहीच उलट आधी बाळासाहेबांच्या आणि नंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात वाढतच राहिली.. सत्तेतही आली.. मात्र शिंदेंचं बंड या सर्वांपेक्षा वेगळं होतं.. शिंदेंसोबत थोडेथोडके नव्हे तर तब्बल 40 आमदार शिवसेनेतून फुटले.

आमदारकी, सरकार वाचवण्याच्या लढाईत शिंदे गटानं थेट शिवसेनेची ओळख असलेल्या नाव आणि चिन्हावर दावा ठोकला.. कायदेशीर लढाईत शिंदेंसमोर उदधव ठाकरे हरले. ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला.. त्यांच्याच मुलाच्या हातून शिवसेना कायमची हिरावली गेली.. 17 फेब्रुवारी राज्याच्या इतिहासात कायमचा लक्षात ठेवला जाईल..