मुंबईकरांनो 'या' दिवसांत समुद्रावर जायचे टाळा; मुंबई महापालिकेने दिला धोक्याचा इशारा

High Tide Alert Issued In Mumbai: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जून महिन्यात समुद्रात मोठी भरती असून उंच लाटा उसळणार आहेत.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 6, 2024, 12:14 PM IST
मुंबईकरांनो 'या' दिवसांत समुद्रावर जायचे टाळा; मुंबई महापालिकेने दिला धोक्याचा इशारा title=
maharashtra weather update Mumbai To Witness High Tide On These Days in june

High Tide Alert Issued In Mumbai: मान्सूनने गोव्यापर्यंत धडक दिली आहे. काहीच दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र राज्य व्यापणार आहे. राज्यातील काही भागात मान्सूपूर्व पावसाच्या सरी बरसल्या आहेत. दरम्यान असे असेल तरी मुंबईत अजूनही समाधानकारक पाऊस झाला नाहीये. मात्र, आज मुंबईत समुद्र किनाऱ्यावर साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. मुंबई महानगर पालिकेने धोक्याचा इशारा दिला असून समुद्रात जाऊ नये तसंच, किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. 

पावसाळ्यात समुद्रात उंच लाटा उसळत आसतात.जून महिन्यात ६,७,८,२३,२३,२४ आणि २५ जूनला मोठी भरती आहे. समुद्राच्या भरती दरम्यान पर्यटक मुंबईतल्या समुद्रकिनारी मोठी गर्दी करतात. यातून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळं यापासून सावध करण्यासाठी बचाव करण्यासाठी जीवरक्षक आणि मुंबई पोलीस समुद्रा किनारी तैनात करण्यात येतात. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेवे नागरिकांना इशारा दिला आहे. 

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या इशाऱ्यानुसार, आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास ४.६९ मीटर इतक्या उंचीच्या लाट उसळणार आहे. तर उद्या ७ जून आणि ८ जूनलाही साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहे. या दरम्यान मोठा पाऊस पडल्यास सखल भागात पाणी साचून मुंबईची वाहतूक खंडित होऊ शकते. या हाय-टाइटच्या काळात मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये, असं आवाहन महापालिकेने केलं आहे. 

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी पुण्यात मान्सूनपूर्व पाऊस बरसला. वडगाव शेरीमध्ये एका तासात तब्बल 114 मिमी पाऊस झाला होता. शहरात इतर ठिकाणी देखील पावसानं झोडपलं अनेक ठिकाणी रस्त्यांना ओढ्या नाल्याचं स्वरूप आलं होतं. मतमोजणी केंद्र देखील गुडघा lभर पाण्याने वेढल गेलं होतं. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं

विदर्भात पावसाचा येलो अलर्ट

विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर सह संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आजपासून पुढील चार दिवस मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. मेच्या अखेरच्या आठवड्यात चांगलेच होरपळून काढल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट झाल्यानंतर आता मान्सून पूर्व पावसाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.