महावितरणचा वीज दरवाढीचा प्रस्ताव

महावितरणनं घरगुती वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. 

Updated: Jul 11, 2018, 09:38 PM IST

मुंबई : महावितरणनं घरगुती वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. वीज नियामक आयोगाकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आलाय. राज्यातल्या १.२० कोटी ग्राहकांच्या वीज दरात ८ पैसे वाढ करण्यात यावी, अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे. महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांमध्ये 0 ते 100 युनिटपर्यंत वीजवापर करणाऱ्या ग्राहकांच्या वीज दरात वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. ३४,६४६ कोटी रुपयांच्या बहुवार्षिक महसुली तुटीच्या वसुलीसाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे महावितरणनं वीज दरवाढ करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवला आहे.