कोरोना संकटात राज्यात रक्ताच्या साठ्यात मोठी कमी, ऐच्छिक रक्तदान शिबीर

कोरोनाचा फैलाव सुरुच आहे. त्यातच रक्त साठ्यात मोठी कमी असल्याचे पुढे आले आहे.   

Updated: May 14, 2020, 10:19 AM IST
कोरोना संकटात राज्यात रक्ताच्या साठ्यात मोठी कमी, ऐच्छिक रक्तदान शिबीर  title=
संग्रहित छाया

दीपक भातुसे / मुंबई : कोरोनाचा फैलाव सुरुच आहे. त्यातच रक्त साठ्यात मोठी कमी असल्याचे पुढे आले आहे.  राज्यात रक्त साठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. १७ मे नंतर लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ब्लड बॅंकांनी ऐच्छिक रक्तदान शिबीर आयोजित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

ऐच्छिक रक्तदान शिबिरासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना पत्र पाठविले आहे. ऐच्छिक रक्तदान शिबीर आयोजित करण्यावर भर देऊन रक्त साठा संकलित करावा, असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे. रक्तसाठा कमी झाल्यामुळे थॅलेसेमिया आणि रक्ताच्या इतर आजारांशी निगडीत रुग्णांना रक्त मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत, त्यामुळे राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील रक्तपेढ्यांना पत्र लिहीले आहे.

सामाजिक आणि धार्मिक संस्था, मोठ्या शहरातील हाउसिंग सोसायटी यांना संपर्क करून ऐच्छिक रक्तदान कॅम्प आयोजित करावेत, रक्तदान कॅम्प आयोजित करताना योग्य काळजी घ्यावी, असेही या पत्रात म्हटले आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेचे अतिरिक्त संचालक डॉ. अरुण थोरात यांनी हे पत्र पाठवले आहे.