T20 World Cup 2024 Prize Money : T20 वर्ल्ड कपमध्ये यंदा रिकॉर्ड प्राइज मनी! चॅम्पियन टीम इंडियाला 204000000, तर पराभूत संघही मालामाल

T20 World Cup 2024 Prize Money : यंदा ICC T20 World Cup 2024 मधील विजेत्या संघाला रिकॉर्ड प्राइज मनी मिळालीय. तर उपविजेत्या संघावरही पैशांचा वर्षाव झालाय. किती पैसे मिळतील पाहूयात. 

नेहा चौधरी | Updated: Jun 30, 2024, 08:37 AM IST
T20 World Cup 2024 Prize Money : T20 वर्ल्ड कपमध्ये यंदा रिकॉर्ड प्राइज मनी! चॅम्पियन टीम इंडियाला 204000000, तर पराभूत संघही मालामाल title=
T20 World Cup 2024 Prize Money Record prize money this time 204000000 to the champion winning team India

T20 World Cup 2024 Prize Money : भारताने अत्यंत रोमहर्षक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत T-20 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलंय. भारताने 2007 साली जेतेपद पटकावले होते आणि आता 17 वर्षांनंतर संघाने पुन्हा इतिहास रचलाय. भारतीय संघ दुसऱ्यांदा चॅम्पियन झाल्यामुळे आयसीसीने तिजोरी उघडलीय. सात धावांनी विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला 20.40 कोटींसह मेन इन ब्लूने अतिरिक्त बोनसही जिंकलाय. T-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे. (T20 World Cup 2024 Prize Money Record prize money this time 204000000 to the champion winning team India )

सर्वाधिक बक्षीस रक्कम?

यंदाचा T20 World Cup अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरला. आतापर्यंत खेळलेल्या सर्व T20 वर्ल्ड कपच्या तुलनेत यावेळी सर्वाधिक बक्षीस रक्कम ठेवण्यात आली होती. ICC नुसार, T20 वर्ल्ड कपच्या नवव्या सिझनमध्ये एकूण US $ 11.25 दशलक्ष निधीची तरतूद म्हणजे सुमारे 93.80 (T20 World Cup 2024 Prize money in Rupees) कोटी रुपये करण्यात आली होती. 

T20 World Cup विजेत्या टीम इंडियाला किती बक्षीस मिळालं?

T20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) जिंकणाऱ्या टीम इंडियाला 2.45 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे 20.42 कोटी मिळाले आहेत. याशिवाय चॅम्पियनची चमकदार ट्रॉफीसह मेडल मिळाले आहेत. टीम इंडियावर पैशांचा पाऊस पडलाय. विशेष म्हणजे पराभूत टीमलाही लक्ष्मी मेहरबान आहेत. 

T20 वर्ल्डकप उपविजेत्याला काय मिळणार?

दुसरीकडे उपविजेत्या संघासाठी मोठी बक्षीस रक्कमही देण्यात आली. वर्ल्डकप गमावल्या असला तरी या संघाला 10.67 कोटी रुपये मिळाले आहेत. 

इतर संघांना काय मिळणार?

आपण आतापर्यंत पाहिलं T20 वर्ल्ड कप विजेत्या आणि उपविजेत्या संघाला काय मिळालं. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांलाही चांगली रक्कम देण्यात आलीय. सुपर 8 मध्ये बाहेर पडलेल्या संघांना 3.8 कोटी रुपये मिळाले आहेत. तर नवव्या ते 12व्या क्रमांकावर असलेल्या संघांना 2.6 कोटी आणि 13व्या ते 20व्या क्रमांकावर असलेल्या संघांना 1.87 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळालीय. 
बक्षीस रकमेव्यतिरिक्त, प्रत्येक विजयासाठी संघाला पैसे देण्यात आलेय. आयसीसीनुसार, प्रत्येक सामना जिंकण्यासाठी संघाला 26 लाख रुपये मिळाले आहेत. मात्र यात उपांत्य किंवा अंतिम सामना (ICC T20 World Cup) याचा समावेश नाही.