Anushka Sharma Instagram Post : 29 जून 2024 चा दिवस इतिहासाच्या पानात लिहिला गेलाय. कारण हाच तो दिवस आहे जेव्हा भारतीय संघाने तब्बल 17 वर्षांनंतर T20 वर्ल्ड कप 2024 वर आपलं नाव कोरलंय. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली होती. जणू काही भारतीय दिवाळी साजरी करत होता. भारतीय संघाच्या विजयानंतर रस्त्यावर उतरून भारतीय फटाके आणि विजयाचा आनंद साजरा करत होते. अख्खा जगात जिथे कुठे भारतीय होते त्यांनी हा क्षण साजरा केला. हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा ठरला.
सोशल मीडियावर सेलिब्रेशनचं व्हिडीओ ट्रेंडमध्ये आहेत. मात्र अशात विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माची एक पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टमध्ये ती म्हणाली की, भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांची लाडकी वामिका ही टेन्शनमध्ये होते. कारण जाणून तुम्हालाही तिचं कौतुक वाटेल.
खरं तर त्या शेवटच्या बॉलने भारताला वर्ल्डकप चॅम्पियन बनवलं. त्यानंतर संघासोबत असंख्य भारतीय भावूक झाले. चिमकल्यांपासून मोठ्यापर्यंत भावूक होऊ रडतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत. सुनील तटकरे यांचा नातूही विजयानंतर रडताना दिसला.
टीव्हीवरही सर्व खेळाडू आनंद अश्रू रोखू शकले नाहीत. हा क्षण प्रत्येकासाठी भावनिक होता. पण दुसरीकडे विराट कोहलीची लाडकी वामिका टीव्हीवर बाबा विराटसह अनेक खेळाडूंना बघून टेन्शनमध्ये आली. आता तुम्ही म्हणाल असं झालं तरी काय? तर अनुष्काने याबद्दल सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबद्दल खुलासा केलाय.
सोशल मीडियावर खेळाडूंचे फोटो शेअर करत अनुष्का म्हणाली की, 'माझ्या मुलीला ही चिंता होती की, टीव्हीवर सर्व खेळाडूंना रडताना पाहून त्यांना मिठी मारणारे कोणीच नव्हेत. होय माझी प्रिय मुलगी, त्यांना 1.5 अब्ज लोकांनी मिठी मारली. किती खात्रीलायक विजय, किती मोठी कामगिरी, चॅम्पियन्सचे अभिनंदन.'
खरंच, हा अभूतपूर्व विजय नोंदवून भारतीय संघाने तमाम भारतीयांचा अभिमान आणि कायम स्मरणात राहिल असा क्षण दिलाय.
अनुष्काने भारतीय संघाच्या विजयानंतर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने विराटचा फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये विराटच्या खांद्यावर भारतीय झेंडा आणि हातात ट्रॉफी होती. त्यावर तिने लिहिलं होतं की, '...आणि मी या माणसावर प्रेम करते. विराट कोहली, मी खूप आभारी आहे तू माझं घर आहेस. आता हे साजरं करण्यासाठी, मला sparkling पाण्याचा ग्लास आण.'
हो, दुसरीकडे विजयानंतर विराट कोहलीने हा आनंद साजरा करण्यासाठी घरी व्हिडीओ कॉल केला होता. या क्षणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या फोटोमध्ये विराट व्हिडीओ कॉलवर मुलांशी विजयाचा आनंद साजरा करताना दिसत आहे.