वरळीतल्या कोस्टल रोडचा मार्ग मोकळा

 वरळीतल्या कोस्टल रोडचा मार्ग मोकळा झालाय

Updated: Feb 4, 2021, 07:51 AM IST
वरळीतल्या कोस्टल रोडचा मार्ग मोकळा title=

मुंबई : मच्छिमारांनी केलेली याचिका कोर्टाने निकाली काढल्याने वरळीतल्या कोस्टल रोडचा मार्ग मोकळा झालाय. समुद्र किनाऱ्यावर टाकण्यात येत असलेल्या भरावाच्या कामामुळे वरळीतील मासेमारीला फटका बसल्याची तक्रार मच्छिमारांनी केली होती. तशा आशयाची याचिका मच्छिमारांनी हायकोर्टात दाखल केली होती. मात्र ही याचिका हायकोर्टानं निकाली काढलीये.

याचिकाकर्त्यांना काही तक्रार असल्यास त्यांनी तज्ज्ञांच्या समितीकडे दाद मागावी अशी सूचना हायकोर्टानं केलीये. लोटस जेट्टीवरुन मासेमारीसाठी नौका समुद्रात जातात. मात्र या परिसरात कोस्टल रोडच्या कामामुळे मच्चीमारी नौकांना समुद्रात नेण्यास बंदी घातलीये. 

त्यामुळे मच्छीमार अडचणीत आल्याची तक्रार करण्यात आली होती. प्रकल्पामुळे मासेमारीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी, मच्छीमारांच्या तक्रारींसाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी एक विशेष समिती पालिकेने स्थापन केलेली आहे. 

या समितीकडे दाद न मागता न्यायालयात याचिका करणे योग्य नसल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला.